न्यू इंग्लिश स्कूल मध्ये इयत्ता सातवी ची शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न

सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ची इयत्ता सातवी ची शिक्षक पालक सभा शनिवार दि. २ ॲागस्ट रोजी उत्साहात संपन्न झाली. या शिक्षक पालक सभेच्या अध्यक्षस्थानी न्यू इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक प्रा. केशव माने होते.
यावेळी व्यासपीठावर संस्था सदस्य प्रा.डॅा.अशोकराव शिंदे,पर्यवेक्षक दशरथ जाधव,तात्यासाहेब इमडे यांच्यासह सर्व पालक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सागर वाघमारे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षक-पालक-समाज या त्रिकूटाची महत्वाची भूमिका उपस्थितांना सांगितली.यावेळी पालकांमधून सुभाष गोडसे,अजय देशमुख,कल्पना गोडसे,लहू दिघे,सारिका गेजगे,महांकाळ,माने यांनी आपल्या सूचना सांगितल्या.
शिक्षक पालक संघाचे पदसिद्ध अध्यक्ष मुख्याध्यापक प्रा.केशव माने यांनी पालकांकडून आलेल्या सर्व सूचनांचे स्वागत केले व त्या सर्व सूचनांचे अंमलबजावणी करण्याचे कबूल केले.
यावेळी संस्थासंचालक प्रा.डॅा.अशोकराव शिंदे म्हणाले की,ही सभा आपल्या मुलांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासाबाबत चर्चा करण्यासाठी आणि आपल्या सहकार्याने त्यांना अधिक चांगले मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. पालक ही मुलांच्या शिक्षणातील सर्वात महत्त्वाची कडी आहेत. आपण घरी मुलांना दिलेला वेळ, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देते. शाळा आणि पालक यांच्यातील सुसंवादामुळे मुलांना एक सकारात्मक आणि प्रेरणादायी वातावरण मिळते. मुलांच्या अभ्यासातील प्रगतीवर लक्ष ठेवा, त्यांच्याशी संवाद साधा आणि त्यांच्या अडचणी समजून घ्या असे सांगितले. शिक्षकां मधून औदुंबर कांबळे,सायली खडतरे,राणी आदलिंगे,वसंत आलदर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता शिंदे,तर आभार कोमल भंडारे यांनी मानले.



