महाराष्ट्र

ला.प्रा.धनाजी चव्हाण बेस्ट कॅबिनेट ऑफिसर पुरस्काराने सन्मानित

सांगोला ( प्रतिनिधी ) आंतरराष्ट्रीय लायन्स संघटना प्रांत ३२३४ ड १ कॅबिनेट ऑफिसर ब्लड डोनेशन व सांगोला लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष ला.प्रा.धनाजी चव्हाण यांचा बेस्ट कॅबिनेट ऑफिसर पुरस्काराने सांगोला येथे संपन्न झालेल्या पदग्रहण समारंभामध्ये माजी प्रांतपाल ला.सुनील सुतार यांचे हस्ते सन्मान झाला.यावेळी मार्गदर्शक प्रांतपाल माजी प्रांतपाल प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.प्रा.नवनाथ बंडगर,रिजन चेअरमन ला.श्रीनिवास कटकुर,झोन चेअरमन ला.सोमशेखर भोगडे उपस्थित होते.

जगातील २५० हून अधिक स्वतंत्र देशात ४८००० पेक्षा जास्त शाखा असणाऱ्या लायन्स आंतरराष्ट्रीय संघटनेच्या कार्यात सुसूत्रता यावी यासाठी प्रांतरचना केली आहे.त्यानूसार प्रांत ३२३४ड१ मध्ये सांगली, सातारा, सोलापूर ,कोल्हापूर रत्नागिरी व पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर तालुक्यांचा समावेश आहे. लायन वर्ष २०२४-२५ मध्ये माजी प्रांतपाल मार्गदर्शक ला. प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांचे मार्गदर्शनाखाली प्रांत ३२३४ड१ मध्ये ‘ब्लड डोनेशन कॅम्प’ याविषयी ला.प्रा.धनाजी चव्हाण यांनी कॅबिनेट ऑफिसर या पदाच्या माध्यमातून केलेले कार्य प्रमाण मानून प्रातांच्या ‘जयघोष’ या अवॉर्ड नाईट समारंभामध्ये प्रांतपाल ला.ॲड.एम. के.पाटील यांनी हा पुरस्कार घोषित केला होता.

यापूर्वी प्रा.चव्हाण यांचा आंतरराष्ट्रीय लायन्स संघटना क्लब एक्सलन्स दोन वेळा,विभाग उत्कृष्ट क्लब अध्यक्ष, उपविभाग उत्कृष्ट क्लब अध्यक्ष,
उत्कृष्ट प्रांत सामाजिक उपक्रम,विभाग उत्कृष्ट लायन,विभाग लायन्स अध्यक्ष वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक सलग दोन वेळा,प्रांत उत्कृष्ट विभागीय सभापती,उपविभाग उत्कृष्ट कॅबिनेट ऑफिसर अशा विविध पुरस्काराने सन्मान झाला आहे. याबद्दल त्यांचे प्रांत ३२३४ ड१ व सांगोला लायन्स क्लब पदाधिकारी व सदस्य यांच्याकडून सर्वत्र अभिनंदन होत आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button