सांगोला गुरुकुल मध्ये “एक राखी सैनिकांसाठी” हा उपक्रम संपन्न.

शिक्षणाविष्कार बहुउद्देशीय व सामाजिक संस्था संचलित, सांगोला गुरुकुल सांगोला(मराठी व इंग्रजी माध्यमाची शाळा)मध्ये “एक राखी सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी व एक राखी भारत मातेचे रक्षण करून आलेल्या माजी सैनिकांसाठी” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.
या कार्यक्रमासाठी सुभेदार मेजर मा.श्री रविकांत मराळ,सुभेदार बाळासाहेब कोकरे,सुभेदार जालिंदर मोरे तसेच संस्थेचे अध्यक्ष मा.श्री मेजर महादेव गोडसे (माजी सैनिक)उपस्थितीत होते. सर्वप्रथम उपस्थितीत सर्व मान्यवरांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष मा.श्री महादेव गोडसे यांच्या हस्ते करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांगोला गुरुकुल चे मुख्याध्यापक मा.श्री गाडेकर सर म्हणाले की,आपण आपल्या भारत मातेचे संरक्षण करण्यासाठी सीमेवरती आपले भारतीय जवान तैनात आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा सण,उत्सव यासाठी कुटुंबाला वेळ देता येत नाही किंबहुना त्यांना सुट्टी मिळत नाही.म्हणून सांगोला गुरुकुल मधील विद्यार्थ्यांनी स्व:हस्ते तयार केलेल्या राख्या आपण मा.श्री मराळ साहेब व त्यांचे सहकारी यांच्या हस्ते पाठवत आहोत.
यानंतर बोलताना मा.श्री मराळ साहेब म्हणाले की,प्रत्येक व्यक्तीने नेहमी सायंकाळी झोपत असताना सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांचे व आपल्याला पोटभर अन्नाचा पुरवठा करणारे शेतकरी यांचे स्मरण करूनच झोपावे आपल्या संरक्षणासाठी सीमेवरती जवान तैनात असतात म्हणून आपण सुरक्षित राहतो तर आपल्या पोटाची भूक भागविण्यासाठी आपल्या जीवाची परवा न करता शेतकरी शेतामध्ये कष्ट करतात म्हणून आपण सुखाने आयुष्य जगतो.याच जवानांना आपल्या भागातून आपल्या आपुलकीच्या माणसांनी राखी पाठवलेली आहे याचा आनंद त्यांना त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी पुरेसा आहे.हा सांगोला गुरुकुलने उपक्रम राबविल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नीलिमा पाटील व सहकारी शिक्षिका यांचे सहकार्य लाभले. यावेळेस शाळेमध्ये रक्षाबंधन सणानिमित्त “एक राखी भावासाठी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.



