महाराष्ट्र
ग्रामपंचायत मांजरी येथे सहाय्यक गटविकास अधिकारी किरण मोरे यांची भेट

सांगोला पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत मांजरी येते दिनांक 8 /8/ 25 रोजी आर. आर.( आबा) सुंदर गाव पुरस्कार योजना या कामी तालुकास्तरीय तपासणी समिती सन 23- 24 चे कामकाज तपासणीसाठी माळशिरस पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी किरण मोरे यांचे समितीमार्फत भेट देण्यात आली त्यावेळी त्यांचे सोबत विस्तार अधिकारी पंचायत श्री ए. एस. कोळी विस्तार अधिकारी कृषी ए. बी. सर्वदे,मधुकर बनसोडे उपस्थित होते. तालुकास्तरीय समितीचे स्वागत सरपंच सौ नसीमा खाजुद्दीन मुजावर ग्रामपंचायत अधिकारी मंगेश पोरे व राहुल चव्हाण यांनी केले.
या अभियानात ग्रामपंचायत तिने केलेल्या लोकसभागातून वृक्षारोपण, कर वसुलीसाठी विशेष उपक्रम, बारकोड वर कर वसुली व बचत गटामार्फत कर वसुलीचा उपक्रम राबवण्यात आला आहे तसेच या वेळी शाळा तपासणी, आरोग्य उपकेंद्रास भेट देऊन कमिटीने तपासणी केली यावेळी सांगोला पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी वसंत फुले विस्तार अधिकारी पंचायत देवराज पुकळे व अमोल तोडकरी, विस्तार अधिकारी आरोग्य मिलिंद सावंत उपस्थित होते तसेच माजी सरपंच मांजरी अमृत उबाळे व अशोक शिनगारे खाजुद्दीन मुजावर, नेताजी जाधव, सुरेश उबाळे , युवा नेते प्रशांत जाधव उपस्थित होत



