गणेशनगर शाळेचे पर्यावरण पूरक रक्षाबंधन

नाझरा(वार्ताहर):-
चोपडी केंद्रांतर्गत येणाऱ्या जि. प. प्राथमिक शाळा गणेश नगर येथे रक्षाबंधन सणाच्या आदल्याच दिवशी शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट 2025 रोजी शालेय परिपाठ म्हणतच राखीनिर्मिती कार्यशाळा घेण्यात आली. यासाठी टिकल्या , मनी, धागे ,छापडीचे गोल, त्रिकोण विविध आकाराचे तुकडे , लेस आशा टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ राखी बनवण्याचे कार्यशाळा घेण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या राख्या शाळेच्या परिसरात असणाऱ्या विविध वृक्षांना बांधण्यात आल्या.
विद्यार्थ्यांनी झाडे आपल्याला काय काय देतात याविषयी माहिती सांगितली. त्यामुळेच आपण फळे, फुले , डिंक, मध, लाकूड,सावली ,ऑक्सिजन इत्यादी विविध बाबी कसलाही मोबदला न घेणाऱ्या झाडांना आपले बंधूच आहेत असे समजून राखी बांधली पाहिजे असे गणेशनगर शाळेच्या मुख्याध्यापिका रूपाली पवार यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. एक पाऊल पर्यावरण संवर्धनाकडे असे म्हणत अनोखा रक्षाबंधन सण गणेशनगर जिल्हा परिषद शाळेवरती साजरा करण्यात आला. सदर कार्यशाळेस पालकांचे सहकार्य लाभले.
एक पेड मा के नाम या उपक्रमांतर्गत शाळेमध्ये इकोक्लब ची स्थापना करण्यात पालकांचा मोठा वाटा आहे. अशा प्रकारचे पर्यावरण पूरक उपक्रम राबवण्यासाठी केंद्रप्रमुख गाडे साहेब व गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले साहेब यांचे मार्गदर्शन मिळाले.



