महाराष्ट्र

स्व. आमदार गणपतराव देशमुख यांचे कार्य दिशादर्शक:.. डॉ. प्रभाकर माळी 

सांगोला (प्रतिनिधी ): ग्रीनिज बुकात नोंद झालेले स्व. आमदार गणपतराव देशमुख यांनी विकास कामातून सांगोला तालुक्याची प्रगती केली, दुष्काळी तालुक्याचा कलंक पुसण्याचे काम त्यांनी केले व त्यामुळे त्यांचे काम दिशादर्शक होते तसेच सांगोला तालुक्यातील शेतीचा विकास त्यांनी केला. त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना अनेक पुरस्कार मिळाले परंतु मिळणाऱ्या पुरस्कारामधून त्या पुरस्काराची उंची वाढली व आज त्यांचे राहिलेले अपूर्ण काम पूर्ण करण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा असे मत सूतगिरणीचे चेअरमन डॉक्टर प्रभाकर माळी यांनी ऋषितुल्य उद्योग समूहातर्फे एमआयडीसी कमलापूर येथे आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी, शालेय विद्यार्थ्यांना वह्या व खाऊवाटप प्रसंगी मत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रमुख अण्णासाहेब पाटील हे होते.

सुरुवातीस स्व.आमदार गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ. प्रभाकर माळी यांच्या हस्ते करण्यात आले व सर्वांचे स्वागत अण्णासो पाटील यांनी केले व आमदार गणपतराव देशमुख यांची काम करण्याची पद्धत वेगळी होती व त्यांनी सर्व समाजातील घटकांना कामाच्या रूपाने न्याय मिळवून दिला आज त्यांचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे असे मत यावेळी अण्णासो पाटील यांनी व्यक्त केले.

सदर प्रसंगी ऋषीतली उद्योग समूहाचे चेअरमन प्रफुल्ल पाटील, मा. सरपंच चंद्रकांत वाघमारे, रणजीत पाटील, रविराज वाघमारे, शिक्षक सुनील आदलिंगे, गणेश कोरे, सुरेश ढोले, बशीर मुलांनी, अनिल खटके, भानुदास जाधव, सुदर्शन डोळ्यांचे हॉस्पिटल सांगली संपर्कप्रमुख अशोक ठोकळे, जानकाबाई घुटुकडे, विद्यार्थी, पालक, शिक्षक, नागरिक उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार अण्णासो पाटील यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button