जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुंजकरवस्ती येथे रक्षाबंधन साजरा व पर्यावरणपूरक उपक्रम

सांगोला – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुंजकरवस्ती येथे रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थिनींनी भावंडांच्या हातावर राखी बांधून गोड पदार्थ देत प्रेम, आपुलकी व बंधुभावाचे प्रतीक जपले. शिक्षकांनी रक्षाबंधनाचा इतिहास व महत्त्व समजावून सांगत हा सण फक्त भाव-बहिणीपुरता मर्यादित नसून परस्परांच्या रक्षणाची व जबाबदारीची भावना वाढवणारा आहे, हे अधोरेखित केले.
विशेष उपक्रम म्हणून विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी शाळेच्या परिसरातील झाडांना राखी बांधून त्यांचे रक्षण करण्याचा संकल्प केला. या उपक्रमातून “झाडे आपले जीवसखा आहेत, त्यांचे संगोपन व संवर्धन हेच आपले कर्तव्य” असा पर्यावरणपूरक संदेश देण्यात आला. श्रीमती सारिका सुभाष गवसने यांनी विद्यार्थ्यांना निसर्गप्रेम, ऐक्य व सहकार्याचे मूल्य पटवून दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती स्मिता दिपक शिंदे यांनी केले.



