सावे माध्यमिक विद्यालयात स्व.आ. डॉ. गणपतराव देशमुख यांना अभिवादन.

.सावे माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्माचार्य, लोकनेते, दिन दलितांचे कैवारी स्व.आमदार डॉ. भाई गणपतराव देशमुख यांची 98 वी जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अर्जुन शेळके सर यांच्या हस्ते स्वर्गीय आमदार डॉ. भाई गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार घालून करण्यात आले
.त्यानंतर श्री. शेळके सर यांनी विद्यालयाच्या व संस्थेच्या वतीने आबासाहेबांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या कार्याची माहिती सर्व विद्यार्थ्यांना सांगितली. जयंतीचे औचित्य साधून विद्यालयामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, स्लो सायकल स्पर्धा, 100 मीटर धावणे, खो-खो, कबड्डी, रस्सीखेच, संगीत खुर्ची इ. स्पर्धा घेण्यात आल्या.
विद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आनंद घेतला. सदर स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ बक्षीस पटकावलेल्या विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण 15 ऑगस्ट 2025 या स्वातंत्र्यदिनी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.प्रास्ताविक व सूत्रसंचालन विद्यालयातील सहशिक्षक श्री. गावडे सर यांनी केले.
त्यानंतर वक्तृत्व स्पर्धेमध्ये अस्मिता शेळके, ऋतुजा वाघमारे, पूनम बंडगर, कल्याण माने अपूर्वा माने, ज्ञानेश्वर मेटकरी, अविष्कार शेळके, विशाल इमडे इत्यादी विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या कार्याची माहिती आपल्या मनोगतातून व्यक्त केली. विद्यालयातील सहशिक्षक श्री. बर्गे सर, मेटकरी सर यांनीही आबासाहेबांच्या कार्याचा आढावा विद्यार्थ्यांना सांगितला.
सदर स्पर्धा विद्यालयात दिनांक 6-8- 2025 ते 8- 8- 2025 या दिवशी घेण्यात आल्या. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना खाऊ वाटप करण्यात आला. आभार प्रदर्शन सहशिक्षक श्री. अनुसे सर यांनी केले.सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम
घेतले.



