महाराष्ट्र

*सांगोला विद्यामंदिरमध्ये गरीब विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप संपन्न

सांगोला (वार्ताहर) उत्तम प्रकारे ज्ञान संपादन करत उच्चशिक्षित व्हा, आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर आजच्या परिस्थितीवर मात करा व कर्तुत्व संपन्न होत भविष्यकाळातील आश्रयदाते बना असे आवाहन माजी प्राचार्य भीमाशंकर पैलवान यांनी सांगोला विद्यामंदिर प्रशालेमधील गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप प्रसंगी मार्गदर्शन करताना केले.

यावेळी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, माजी प्राचार्य नारायण विसापूरे, बाळासाहेब वाघमारे, प्राचार्य अमोल गायकवाड, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, विभाग नियंत्रक व पर्यवेक्षक काकासाहेब नरूटे,लायन्स क्लब अध्यक्ष नवनाथ बंडगर, बाळराजे सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थापक अध्यक्ष कै.चंद्रशेखर विश्वनाथ तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार समर्पण करून पूजन करण्यात आले.प्रास्ताविकातून प्राचार्य अमोल गायकवाड यांनी सर्व देणगीदारांना धन्यवाद देत मान्यवरांचे स्वागत केले.

मोफत गणवेश वाटपासाठी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला, लायन्स क्लब, सांगोला, उद्योगपती बाळासाहेब मस्के, उद्योगपती उत्तम ढोले, माजी प्राचार्य नारायण विसापुरे, बाळासाहेब वाघमारे, भीमाशंकर पैलवान, प्राचार्य अमोल गायकवाड, पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, मुख्य लिपीक हेमंत नलवडे, सौ.पद्मिनी कुलकर्णी, सुकानंद हळ्ळीसागर, श्रीमती सुमन शरदचंद्र पाटणे, सहकारी शिक्षक बाळराजे सावंत, अशपाक काझी, अश्विनी साळुंखे, नागेश पाटील, निलेश जंगम, लिपीक चांगदेव कुंभार, चेतन भांडेकर, वसंत कपडेकर, अरुण सुरवसे, गिरीश पाटोळे आदी देणगीदारांनी आर्थिक सहकार्य करून मदत केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव कोठावळे यांनी तर देणगीदारांबद्दल ऋण व्यक्त करत उपस्थित मान्यवरांचे आभार राजेंद्र ढोले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमुख नरेंद्र होनराव यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button