फॅबटेक पब्लिक स्कूलचा निकाल शंभर टक्के*

फॅबटेक पब्लिक स्कूलचा केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड नवी दिल्ली (सीबीएसई) तर्फे घेण्यात आलेल्या दहावी २०२३-२४ परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून फॅबटेक पब्लिक स्कूलची ही दुसरी बॅच आहे. या निकालामध्ये प्रथम श्रेणीमध्ये चार विद्यार्थी आहेत. कुमारी ऋतुजा संतोष टिंगरे या विद्यार्थिनीने  ८८  टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम, कुमारी प्रणिता रामचंद्र म्हारनुर हिने ८१ टक्के गुण घेऊन द्वितीय , कुमारी सलोनी प्रवीण गुंगे हिने ८० टक्के गुण घेऊन तृतीय स्थान मिळवले आहे. तर कुमारी दिव्यांका संताजी दिवसे ७६ टक्के गुण मिळाले आहेत. विषय निहाय निकाल पाहता मराठी विषयात १०० पैकी ९९ गुण, सामाजिक शास्त्र विषयात ९५ गुण, ए.आय. विषयात ८९ गुण, विज्ञान विषयात ८४ गुण, हिंदी विषयात ८३ गुण, इंग्रजी विषयात ८२ गुण संपादन केले आहेत.
              फॅबटेक संस्थेचे अध्यक्ष श्री. भाऊसाहेब रुपनर, संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अमित रुपनर, संस्थेचे कार्यकारी संचालक दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटे, शाळेचे प्राचार्य श्री.सिकंदर पाटील आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button