सांगोला येथील श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक बहुउद्देशीय संस्था संचलित मूकबधीर निवासी शाळेस महाविद्यायातील प्राध्यापक व बीकॉम भाग.3 मधील विद्यार्थ्यांनी भेट देऊन, तेथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व अल्पोपार वाटप केले. यावेळी शाळेतील शिक्षिका श्रीमती रेश्मा रमेश गजघाटे यांनी विद्यार्थी व प्राध्यापकांचे स्वागत केले. वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. विद्या जाधव, प्रा. सचिन सुरवसे, प्रा. प्राप्ती लामगुंडे, प्रा.समाधान माने यांनी तेथील शिक्षकांशी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केल्याचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सांगितले. मूकबधीर निवासी शाळेतील शिक्षकांनी महाविद्यालयातील प्राध्यापकांचे व विद्यार्थ्यांचे आभार मानले. ही भेट यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले व कार्यालयीन अधिक्षक श्री. प्रकाश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.