भीमनगर जिल्हा परिषद शाळेस सेवानिवृत्त तहसीलदार संजय खडतरे परिवाराच्या वतीने स्मार्ट टीव्ही भेट.

सांगोला शहरातील भीम नगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस  कै मंजुळाबाई भगवान खडतरे यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त  सेवानिवृत्त तहसीलदार संजय खडतरे यांच्या परिवाराच्यावतीने विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी एल एडी टीव्ही संच प्रदान करण्यात आला यावेळी सर्व ग्रामस्थ नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

यावेळी बोलताना सेवानिवृत्त तहसीलदार संजय खडतरे म्हणाले सुसंस्कराचं शिक्षण देणारी आई जग सोडून गेली. तिची आठवण कायम स्मरणात राहावी, तिच्या स्मृतिप्रित्यर्थ समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, ही भावना जपत माझ्या जन्मभूमीतील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना स्वखर्चातुन एल.ई. डी स्मार्ट टीव्ही उपलब्ध करून दिला. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी निश्चितच सोपे जाणार आहे. सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून आईच्या स्मृतिप्रित्यर्थ  गरजू व गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मदत व्हावी या उद्देशाने कार्य चालू असते. असे त्यांनी शेवटी सांगितले.

या कार्यक्रमास बापूसाहेब ठोकळे बाबा बनसोडे अक्षय बनसोडे प्रवीण बनसोडे सचिनदादा सावंत विजयाताई बनसोडे, रेश्माताई बनसोडे, मैनाताई बनसोडे  रुपेश बनसोडे, रंभाजी बनसोडे, मोहन गुडदौरू, अनिल माने,  अप्सरा ताई ठोकळे, अनिताताई काटे, शोभा बनसोडे, संतोष ठोकळे, दीपक ऐवळे, अविनाश चंदनशिवे, दत्तात्रय रणदिवे संजय खडतरे , राजेश खडतरे सौ प्रभा खडतरे , सौ सारिखा खडतरे पल्लवी खडतरे ,सौरभ खडतरे साहिल खडतरे, जान्हवी खडतरे खडतरे परिवार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य  मुख्याध्यापिका श्रीमती वैशालीताई शेळके मॅडम यांनी सर्वाचे आभार मानले. परिसरातील सर्व ग्रामस्थ शिक्षक शिक्षकेतर अंगणवाडी सेविका ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button