लोणारी समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी 20 ऑगस्ट रोजी मंत्रालयात लोणारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक आहे याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मान्यतेसाठी लवकरच ठेवण्यात येईल अशी ग्वाही मंत्री अतुल सावे यांनी दिली.लोणारी समाजाच्या विविध मागण्यांसाठी 20 ऑगस्ट रोजी मंत्रालयात मंत्री सावे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
लोणारी समाजातील बांधवांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक आहे या अनुषंगाने बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते. लोणारी समाजासाठी समाजरत्न विष्णुपंत दादरे लोणारी यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी लवकरच ठेवण्यात येईल.लोणारी समाज वंचित समाज असून त्यासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून करण्यात येत होती.
या मागणीसाठी 13 ऑगस्ट रोजी सांगोला तहसिल कार्यालय सांगोला येथे बेमुदत आमरण उपोषण समाजाकडून करण्यात आले होते . त्याची दखल घेऊन 20 ऑगस्ट रोजी मंत्रालय येथे बैठक घेण्याची ग्वाही राज्य शासनाने दिली होती. त्याअनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आर्थिक विकास महामंडळासोबत लोणारी समाजाच्या विद्यार्थी विद्यार्थिनी साठी नवी मुंबई व पुण्यामध्ये वसतीगृह सुरू करावे, लोणारी समाजाचे विष्णुपंत दादरे यांचे सांगोला तालुक्यात स्मारक व लोणारी भवन उभारण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती लोणारी समाज सेवा संघ सांगोला चे अध्यक्ष संतोष करांडे यांनी दिली
या बैठकीस आमदार जयकुमार गोरे, आमदार .गोपीचंद पडळकर,आमदार संजय मामा शिंदे,मान तालुका भाजप चे अध्यक्ष शिवाजी शिंदे साहेब व इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, व प्रशासकीय अधिकारी,व उपोषणकर्ते अध्यक्ष संतोष करांडे,सचिव दत्तात्रय नरळे ,ता.संघटक बाबासाहेब खांडेकर,डॉ सुदर्शन घेरडे तसेच लोणारी समाज सेवा संघ सांगोला संघटनेच्या पदाधिकऱ्या सोबत महाराष्ट्र मधील विविध भागांतील लोणारी समाज बांधवांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.