सांगोला ( प्रतिनिधी ) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत इयत्ता नववी ते बारावी किशोरवयीन मुलींना आरोग्य व स्वसंरक्षणपर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
यावळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे डॉ. जानकी बनसोडे,ॲड.सुप्रिया बोत्रे,मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्र उपाध्यक्ष ॲड मनिषा भोसेकर, समुपदेशक गणेश बाबर, संस्था कार्यकारिणी सदस्य व कार्यकमाच्या अध्यक्षा शीला झपके,प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक सुरेश मस्तुद, प्रदीप धुकटे, मच्छिंद्र इंगोले, उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास प्रमुख पाहुणे व संस्था कार्यकारिणी सदस्य शीला झपके यांचे हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला. त्यानंतर आरोग्य व स्वसंरक्षणपर मार्गदर्शन करताना प्रथम डॉ.जानकी बनसोडे यांनी शारीरिक, भावनिक,मानसिक बदल कसे होतात, योग्य वेळी आराम करणे, वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे, आई-वडिलांशी संवाद तसेच व्यायाम यासंदर्भात मार्गदर्शन केले.तसेच ॲड.मनीषा भोसेकर यांनी आपल्या मनोगतातून मोबाईलचा वापर करू नये असे सांगत रोज संध्याकाळी पाच मिनिटे फक्त स्वतःला वेळ द्या, मनाशी संवाद साधा, चांगले वाचन करा त्यातून चांगले व्यक्तित्व होईल असे सांगितले
त्याचप्रमाणे ॲड सुप्रिया बोत्रे यांनी पोक्सो कायदा, लैंगिक अत्याचार, हिंदू विवाह कायदा समजावत स्वतःचे संरक्षण कसे करावे याविषयीचे मार्गदर्शन केले.अध्यक्षीय मार्गदर्शन करताना संस्थेच्या कार्यकारिणी सदस्या शीला झपके यांनी मुलींना प्रबोधन करत प्रेरणादायी कवितेचे सादरीकरण केले.या कार्यक्रमासाठी प्रशाला व ज्युनिअर कॉलेज शिक्षिका व नववी ते बारावी विद्यार्थ्यींनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अमोल गायकवाड यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख व सूत्रसंचालन प्रा.अर्चना कटरे यांनी केले तर आभार प्रदर्शन शैलजा झपके यांनी केले.