महाराष्ट्र

आकाशाएवढी उंची लाभलेले नेतृत्व म्हणजे स्व.आ.डॉ. भाई गणपतरावजी देशमुख – जेष्ठ साहित्यिक व.बा. बोधे 

सांगोला / प्रतिनिधी- १३ ऑगस्ट रोजी स्व.आ.डॉ. भाई गणपतरावजी देशमुख यांच्या जयंती (श्रमिक दिन) निमित्त विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला व न्यू इंग्लिश स्कूल सांगोलाच्या कॅम्पस मध्ये संपन्न झाले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यिक व विचारवंत मा.प्रा.व.बा बोधे हे उपस्थित होते

त्यावेळी ते कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून बोलताना म्हणाले कि आकाशाएवढी उंची लाभलेले नेतृत्व म्हणजे स्व.आ.डॉ. भाई गणपतरावजी देशमुख हे आहेत. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले कि स्व.आ.डॉ. भाई गणपतरावजी देशमुख उर्फ आबासाहेब यांच्या शब्दाला खूप किंमत होती. जी कामे वर्ष वर्ष होत नव्हती ती कामे फक्त आबासाहेब यांच्या एका भेटीत होत होती असे त्यांनी सांगितले.

त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व युवकांचे आशास्थान मा.डॉ.अनिकेत(भैय्या) देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना असे सांगितले कि महापुरुषांच्या जयंत्या ह्या प्रबोधनाने साजऱ्या केल्या पाहिजेत. तसेच तरुण मुलांनी व्यसनाच्या आहारी न जाता व्यायाम व अभ्यास नियमित केला पाहिजे.

श्रमिक दिनानिमीत्त श्रमिक जोडपे म्हणून मानसन्मान या वर्षी चिंचोली गावचे जेष्ठ शेतकरी मा.श्री. धोंडीराम गोविंद गडदे व सौ.लक्ष्मीबाई (धोंडाबाई) धोंडीराम गडदे या भाग्यवंत पती पत्नीस भेटला आहे. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकानंतर प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा.डॉ.किसन माने यांनी करून दिली. प्रमुख पाहुण्यांच्या ओळखीनंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला.

        अध्यक्षीय भाषणानंतर गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, रंगभरण, कथाकथन, रेकॉर्डेड लोकनृत्य स्पर्धा यांच्या बक्षिस वितरणाचे सूत्र संचलन प्रा.डॉ. पांडुरंग रुपनर यांनी केले. व मॅरेथॉन स्पर्धेच्या बक्षिस वितरणाचे सूत्र संचलन प्रा. पवार व्ही.एम यांनी केले.

         सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून श्रीमती रतनबाई गणपतराव देशमुख उर्फ बाईसाहेब, संस्थेचे सचिव मा.श्री. विठ्ठलराव शिंदे सर, सूतगिरणीचे चेअरमन डॉ. प्रभाकर माळी, शेकापक्षाचे जेष्ठ नेते मा.श्री. सुरेश माळी, संस्था सदस्य प्रा. अशोकराव शिंदे, प्रा. दीपक खटकाळे, श्री अवधूत कुमठेकर(मालक), प्रा. जयंत जानकर व डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिकंदर मुलाणी, न्यू इंग्लिश स्कूल व ज्यू. कॉलेजचे प्राचार्य प्रा. केशव माने सर व न्यू इंग्लिश स्कूल पूर्व प्राथमिक व प्राथमिकचे प्राचार्य श्री. दिनेश शिंदे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अशोक कांबळे, सौ.इंदिरा येडगे मॅडम, सौ.स्मिता इंगोले मॅडम,उपप्राचार्य श्री संतोष जाधव, जिल्हा दूध संघाचे संचालक मा.श्री. मारुती लवटे, मा.श्री. शिवाजीराव बंडगर, माजी उपप्राचार्य संजय शिंगाडे, माजी प्राध्यापिका निलीमा कुलकर्णी, युवा नेते बिरुदेव शिंगाडे, रासपचे युवा नेते मा.श्री. आबा मोटे, मा.श्री.किशोर बनसोडे, मा.श्री. दिपक बनसोडे सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रा. दत्तात्रय देशमुख, प्रा.डॉ. सिमा गायकवाड, सौ. राजश्री केदार-पाटील यांनी केले आहे. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिकंदर मुलाणी व आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अशोक कांबळे यांनी केले आहे. कार्यक्रमाचा समारोप पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून व राष्ट्रगीत गायनाने करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button