डॉ. राजु जानकर यांच्या श्रीनंद चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन-आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन- आरोग्य योजने अंतर्गत एक आगळा-वेगळा कार्यक्रम म्हणजे एकाच वेळी ५१ बालकानावर्ती वेगवेगळ्या आजारासाठी ऍडमिट असल्यामुळे योजनेतील बालकांना व नातेवाईकांना भेट देण्यासाठी डॉ. निकिताताई देशमुख यांनी श्रीनंद हॉस्पिटला भेट दिली व ऍडमिट पेशंटची पाहणी केली
यामध्ये (PICU, NICU, WARD) च्या पेशंटच्या नातेवाईकांशी संवाद साधला व हॉस्पिटलच्या सर्व सोयी- सुविधांची पाहणी केली व मार्गदर्शन करताना डॉ. निकिताताई म्हणाल्या की सांगोल्यासारख्या ग्रामीण भागामध्ये नवजात बालकांना मेंदूरोग तज्ञ, हृदयरोग तज्ञ ( 2D echo), नेत्ररोग तज्ञ, ऑपरेशनच्या सर्व सोयी इत्यादी सुपरस्पेशालिटी उपलब्ध करून रुग्णांना एकाच ठिकाणी सर्व उपचार मिळण्याची सोय डॉ. जानकर सर यांनी करून दिले आहे व योजनेमध्ये कमी दिवसाचे, कमी वजनाचे व जन्मजात सर्व बाळांना (NICU) मोठी व सुसज्ज सोय करून ठेवले आहे त्यासाठी गरीब व गरजू पेशंटने श्रीनंद हॉस्पिटलमध्ये मोफत योजनेचा लाभ घ्यावा तसेच 21 वर्ष बाळांची सेवा करणारे देवदूत म्हणजे डॉक्टर जानकर सर असे त्यांनी कौतुक केले व लहान बालकांच्या हस्ते केक कापून आनंद साजरा करण्यात आला.
महात्मा ज्योतिराव फुले जन-आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन-आरोग्य योजनेतुन १३५६ आजारावरती कोणकोणत्या हॉस्पिटलमध्ये, कोणत्या आजारावर मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात याची माहिती सोलापूर जिल्हा समन्वयक नागेश बनसोडे यांनी दिली तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे याची माहिती दिली तसेच श्रीनंद हॉस्पिटल येथे 2020 पासून आज पर्यंत 1955 बालकांना मोफत औषध उपचार शस्त्रक्रिया झाल्याची माहिती दिली तसेच त्यांनी उपस्थित नातेवाईकांना व नागरिकांना आयुष्यमान कार्ड (गोल्डन कार्ड) काढून घेण्याची विनंती केली व प्रत्येकाने आपले रेशन कार्ड ऑनलाइन काढून घ्यावे असे आवाहन केले.
तसेच डॉ. जानकर सर यांनी 21 वर्ष लहान बालकांचे तपासणी व उपचार अनुभव सांगितले योजनेअंतर्गत लहान बाळांना, गरजूंना सर्वतोपरी मदत करत आहे व सांगोल्या सारख्या शहरात १० वर्षापासून मेंदू रोग तज्ञ, हृदयरोग तज्ञ नेत्ररोग तज्ञ लहान मुलांचे ऑपरेशन ची सोय अशा सुपर स्पेशालिटी सेवा सांगोला भागात दिली आहे याचा फायदा सांगोला भागातील पेशंट न होत आहे उपलब्ध करून पेशंटला सेवा देत आहे तसेच हृदयाच्या संबंधित 2D इको उपलब्ध आहेत व सर्व प्रकारच्या ऑपरेशन सुविधा उपलब्ध आहेत तरी पेशंटने हॉस्पिटल मध्ये या योजनेचा लाभ घ्यावा असे सांगितले.
सदरच्या कार्यक्रमासाठी डॉ. निकिताताई बाबासाहेब देशमुख, डॉ. राजेंद्र जानकर, डॉ. अनिता जानकर, श्री नागेश बनसोडे (जिल्हा समन्वयक महात्मा फुले जन आरोग्य योजना सोलापूर) आरोग्यमित्र – पूजा शेळके, सुभाष बनसोडे, स्वप्निल बाबर, गौरी चंदनशिवे, आसिफ पठाण, तसेच चेतन माने, अरुण कोळेकर, विजय मोरे, विकास शिंदे, अमर हिंगमिरे, शितल भोसले व सर्व स्टाफ, व पेशंटचे नातेवाईक यांचे उपस्थिती होती