सांगोला विद्यामंदिरमध्ये पाचवी शिष्यवृत्ती वर्गाची पालक सभा संपन्न

सांगोला (वार्ताहर) सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गातून विद्यार्थ्यांमध्ये भविष्यामधील एमपीएससी यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांचा पाया भक्कम करण्याचे काम आमचे शिक्षक करत असून याकरिता विद्यार्थ्यांनी सुद्धा कठोर परिश्रमाला पर्याय नाही हे लक्षात घेऊन सातत्याने वाचन व उदाहरणांचा सराव करावा, यातूनच गुणवत्तेची निर्मिती होत आहे यासाठी विद्यार्थी शिक्षक व पालक यांचा योग्य समन्वय महत्त्वपूर्ण ठरतो, पालकांनी विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी योग्य आहार व अभ्यासाकरिता तणावमुक्त वातावरण पाल्याला उपलब्ध करून द्यावे आणि विद्यामंदिरची गुणवत्तेची परंपरा अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे असे उद्गार नूतन उपमुख्याध्यापक चिंतामणी देशपांडे यांनी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाच्या शिक्षक पालक सभेदरम्यान अध्यक्ष स्थानावरून बोलताना काढले.
यावेळी व्यासपीठावर विभाग नियंत्रक पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, संस्था बाह्यपरीक्षा विभाग प्रमुख नामदेव खंडागळे, प्रशाला बाह्यपरीक्षा विभागप्रमुख सिताराम राऊत, विभाग प्रमुख नागेश पाटील व दत्तात्रय पाटील उपस्थित होते.
विभाग नियंत्रक प्रदीप धुकटे यांनी प्रास्ताविकातून पालक सभेचा हेतू स्पष्ट करत उपस्थित पालकांचे स्वागत केले.
सभेच्या सुरुवातीलाच शिक्षक व शिकवत असलेल्या विषयांचा परिचय करून देण्यात आला.
वर्षभराच्या नियोजनाचा लेखाजोखा घेत विभाग प्रमुख नागेश पाटील यांनी योग्य नियोजनानुसार अभ्यास केल्यास विद्यार्थी नक्कीच जिल्हा व राज्य गुणवत्ता यादी पर्यंत पोहोचतील याबद्दल पालकांना आश्वस्त केले.
पालक मनोगतातून संतोष जहागीरदार, सौ.ऋतुजा केदार, सौ.सविता जाधव, सौ.अर्चना चव्हाण, सौ.कोंडूभैरी व संतोष गुळमिरे यांनी सूचना मांडत राबवल्या जात असणाऱ्या मोफत मार्गदर्शन वर्गाविषयी समाधान व्यक्त केले.
यावेळी चैतन्य कांबळे (बुद्धिमत्ता), संध्या तेली (इंग्रजी), आशितोष नष्टे (मराठी), वैभव कोठावळे (गणित) यांनी शिक्षक मनोगतातून पालकांना संबोधित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैतन्य कांबळे यांनी तर आभार दिग्विजय चव्हाण यांनी मानले.
यावेळी अश्विनी साळुंखे, रूपाली देशमुख, धनश्री ढोले, दत्तात्रय कांबळे, संगीता भोसले या शिक्षकांसह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
सभा यशस्वी करण्यासाठी विभागातील सर्व शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



