महाराष्ट्र

सांगोला विद्यामंदिरची अनुश्री खुळपे रांगोळी स्पर्धेत प्रथम, तेजश्री रणदिवे द्वितीय, रुचिता कदम तृतीय

सांगोला (वार्ताहर) सांगोला नगरपरिषदेच्या वतीने ‘हर घर तिरंगा घर घर तिरंगा – 2025’ या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेमध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले.

यामध्ये कुमारी अनुश्री महेश खुळपे इयत्ता दहावी – ब, हिने प्रथम क्रमांक मिळवत प्रशस्तीपत्र व रोख रुपये 2501 पारितोषिक संपादन केले.

तसेच कुमारी तेजश्री लक्ष्मण रणदिवे इयत्ता नववी – क, हिने द्वितीय क्रमांक मिळवत प्रशस्तीपत्र व रोख रुपये 1501, कुमारी रुचिता संजयकुमार कदम इयत्ता नववी – ब, हिने तृतीय क्रमांक मिळवत प्रशस्तीपत्र व रोख रुपये 1101 तर कुमार मनीष मनोजकुमार पाटील इयत्ता दहावी – ब, याने उत्तेजनार्थ क्रमांक मिळवत प्रशस्तीपत्र व रोख रुपये 701 पारितोषिक संपादन केले.

वरील स्पर्धेच्या नियोजनासाठी उत्सव विभाग प्रमुख नरेंद्र होनराव यांचे सहाय्य लाभले.

यशस्वी विद्यार्थ्यांना आदर्श कलाशिक्षक अमोल उकळे व समाधान शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, कार्यकारणी सदस्य विश्वेशजी झपके यांच्यासह प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापक चिंतामणी देशपांडे, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, उत्तम सरगर, काकासो नरुटे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button