महाराष्ट्र

जवळा पंचक्रोशीमध्ये गणरायाची उत्साहात प्रतिष्ठापना.

जवळा(प्रशांत चव्हाण) सर्वांच्या लाडक्या गणरायाचे भक्तिमय वातावरणात जल्लोषात स्वागत करण्यात आले.जवळा गाव व आसपास असणाऱ्या चार वाड्यांवर गणेशोत्सव मंडळांनी गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया’ वाजत गाजत आला रे आला गणपती आला अशा गगनभेदी घोषणा देत गणरायाची जल्लोषात प्रतिष्ठापना केली.तसेच प्रत्येक घरोघरी बाप्पाची विधिवत भक्तिभावाने प्रतिष्ठापना करण्यात आली. पावसानेही गणेश उत्सवाच्या पहिल्या दिवशी हजेरी लावल्याने भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.जवळा येथील अहिल्या चौक छत्रपती संभाजी महाराज चौक,घेरडी रोड,श्री.म्हसोबा रोड या ठिकाणीआकर्षक गणेश मूर्तीसह सजावटीच्या साहित्याचे स्टॉल लावण्यात आले होते.

सकाळपासूनच गणेश भक्तांनी श्री.गणेशाच्या आकर्षक मूर्ती आणि सजावट साहित्य तसेच स्वीट मार्ट मध्ये मिठाईची खरेदी करण्यासाठी कुटुंबासह स्टॉलवर गर्दी केली होती. विशेष म्हणजे गौराईचा सण तीन दिवसावर येऊन ठेपल्याने महिला वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. गणरायाच्या आगमना बरोबर पावसाचे दमदार आगमन होऊ दे अशी प्रार्थना भक्तानी मनोभावे गणेशाकडे केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button