पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पंढरपूर आंतर महाविदयालयीन बुद्धिबळ स्पर्धा दि. 18 ते 20 ऑगस्ट 2025 रोजी संपन्न झाल्या.
या स्पर्धेमध्ये सांगोला महाविद्यालयाचा विद्यार्थी सुमित आप्पासो जाधव या विदयार्थ्याची पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठ संघात निवड झाली. या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष मा.श्री.तात्यासाहेब केदार व मा.श्री.प्रा.पी.सी. झपके, खजिनदार मा. श्री. नागेश गुळमिरे, सचिव ॲड. उदय(बापू) घोंगडे, सहसचिव मा. श्री. साहेबराव ढेकळे व इतर संस्था पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी अभिनंदन केले. खेळाडूला प्र.प्राचार्य डॉ. सुरेश भोसले, शारीरिक शिक्षण संचालक प्रा.जगदीश चेडे, व जिमखाना कमिटीचे सर्व सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले.