उष्माघात होऊन पक्षी मरताहेत, पक्षांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन!

सांगोला ( प्रतिनिधी )- सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे पक्षी पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. या पक्षांना आपल्या घराच्या छतावर किंवा आसपास पाणी ठेवून त्यांचे जीव वाचवावेत, असे आवाहन पक्षी प्रेमी ग्रुपच्या वतीने करण्यात येत आहे.
सगळीकडेच सध्या उन्हाचा तडाखा वाढत असल्यामुळे पक्षी, प्राणी पाण्याच्या शोधात फिरत आहेत परंतु पाणी न मिळाले मुळे ते आपला जीव गमावतांना दिसत आहेत. असाच प्रकार मंगळवारी घडला. पंढरपूर रोडवर एक होला पक्षी पाण्याच्या शोधात फिरत असताना उष्माघाताने तो पडला. त्याला सुमित चांदणे या युवकाने पाणी देऊन वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो वाचू शकला नाही. तेव्हा सर्व नागरिकांनी आपापल्या घराच्या छतावर किंवा घराच्या आजूबाजूला पक्षी व प्राण्यांसाठी पिण्याची पाण्याची व्यवस्था केली तर असे फिरत येणारे पक्षी उष्माघातापासून वाचतील.
यावर्षी मोठा कडक उन्हाळा पडत असल्यामुळे पक्षी, प्राणी वाचवण्याचे काम आपण सर्वांनी मिळून करायला हवे. एप्रिल व मे हे दोन महिने कडक उन्हाचे असल्यामुळे या दोन महिन्यात पक्षी व प्राण्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. -.प्रा. डॉ. विधीन कांबळे सर पक्षी प्रेमी, सांगोला.