महाराष्ट्र
*सांगोला विद्यामंदिरमध्ये सातवी शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ

सांगोला (वार्ताहर) महाराष्ट्र शासनाने नव्याने जाहीर केल्यानुसार शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवीकरिता राबवली जाण्याची शक्यता असून त्यासाठी सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांची योग्य तयारी होण्यासाठी सांगोला विद्यामंदिर प्रशालेमध्ये इयत्ता सातवी शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ करण्यात आला आहे, सातवी शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग ही विद्यार्थ्यांसाठी आणखी एक शिष्यवृत्ती मिळवण्याची नवी संधी असून या मार्गदर्शन वर्गाचा लाभ घेत राज्य व जिल्हा गुणवत्तेतील शाळेची परंपरा कायम राखावी असे आवाहन प्राचार्य अमोल गायकवाड सर यांनी इयत्ता सातवी शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलताना विद्यार्थ्यांना केले.
यावेळी व्यासपीठावर उपमुख्याध्यापक चिंतामणी देशपांडे, विभाग नियंत्रक व पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, उत्तम सरगर, काकासाहेब नरुटे, प्रशाला बाह्यपरीक्षा विभाग प्रमुख सिताराम राऊत उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते देवी सरस्वतीच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रास्ताविकातून पर्यवेक्षक प्रदीप धुकटे यांनी विद्यार्थ्यांना त्यांची मार्गदर्शन वर्गातील उपस्थिती व अभ्यासातील सातत्य याचे महत्त्व सांगत सर्वांचे स्वागत केले.
प्रशाला बाह्यपरीक्षा विभाग प्रमुख सिताराम राऊत यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे जीवनातील महत्त्व स्पष्ट करत अभ्यासातील सातत्यानेच यश मिळते असे आपल्या मनोगतातून सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभाग प्रमुख दादासाहेब वाघमोडे यांनी तर आभार स्वाती चांदणे यांनी मानले. यावेळी विभागातील सुनील भोरे, अशपाक काझी, रूपाली सरगर, वैशाली पाटील, स्वाती राऊत या शिक्षकांसह विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाह्यपरीक्षा विभागातील सर्व शिक्षक-शिक्षिका यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



