प्राचार्य अमोल गायकवाड यांचा मुख्याध्यापक गौरव पुरस्काराने सन्मान

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अमोल गायकवाड यांचा रायझिंग ट्रायबल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी शिक्षक संघटना अहिल्यानगर यांच्याकडून राज्यस्तरीय मुख्याध्यापक गौरव पुरस्काराने सन्मान झाला आहे
प्रमुख पाहुणे माजी शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य,पुणे दिनकर टेमकर,शिक्षणाधिकारी (माध्य.) जिल्हा परिषद अहिल्यानगर दिलीप थोरे,वेतन अधीक्षक प्राथमिक अहिल्यानगर हेमंत साळुंके प्रशासनाधिकारी मनपा शिक्षणविभाग अहिल्यानगर जुबेर पठाण यांचे शुभहस्ते व सहसंचालक,प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य,पुणे रमाकांतजी काठमोरे यांचे अध्यक्षतेखाली .नगरसेवक अहिल्यानगर महानगरपालिका योगीराज गाडे,विशेष निमंत्रक स्वप्निल गायकवाड सरपंच कोंढापुरी शिरूर यांचे उपस्थितीत
हॉटेल यश ग्रँड स्टेशन रोड अहिल्यानगर येथे रविवार दिनांक १४ सप्टेंबर २०२५ सकाळी ठीक ११:३० वाजता हा शिक्षण गौरव पुरस्कार प्रदान समारंभ संपन्न झाला.या समारंभासाठी रायझिंग ट्रायबल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी शिक्षक संघटना अ. नगर सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.प्राचार्य अमोल गायकवाड यांचा यापूर्वी सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार व परिवर्तन सामाजिक संस्था राज्यस्तरीय क्रांतीसुर्य महात्मा फुले आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मान झाला आहे. या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.



