महाराष्ट्र

सांगोल्यातील श्रीराम गणेश मंडळाचा जिल्ह्यात तिसरा क्रमांक 

 पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते गणेश मंडळाचा सन्मान 

सांगोला/प्रतिनिधी:: यांच्या गणेश उत्सवात मा.जिल्हाधिकारी व ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी डॉल्बी मुक्त गणेश उत्सव साजरा करण्याचे आव्हान करून  जिल्हा स्तरावर गणेश मंडळासाठी स्पर्धा ठेवली होती.सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण बुधवार दि.१७ सप्टेंबर रोजी संपन्न झाला यामध्ये सांगोला शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या श्रीराम तरुण गणेश मंडळास ग्रामीण पोलिस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी,यांच्या हस्ते प्रमाण पत्र सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर अप्पर पोलिस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर अधिकारी  पर्यावरण संतुलन,राष्ट्रीय उपक्रम,प्रबोधन करीत डॉल्बी मुक्त उत्सव साजरा करणाऱ्या मंडळासाठी सोलापूर ग्रामीण पोलिस यांच्या वतीने जिल्हा स्तरावर स्पर्धा ठेवण्यात आली होती.यासाठी सुमारे ३ हजार ४०० मंडळाच्या गणेश उत्सवा दरम्यान तसेच वर्षभर ज्या मंडळानी राष्ट्रीय,सामाजिक, पर्यावरण पुरक उपक्रम राबविले याची पाहणी करण्यात आली होती.यामध्ये सांगोला शहरातील श्रीराम तरुण गणेश मंडळाने यापूर्वी गुजरात निधी,किल्लारी, पंढरपूर, शिरोळ याभागात आपत्कालीन परिस्थितीत केलेली मदत,चालू वर्षी गणेश उत्सवात राबविलेले रक्तदान,वृक्षारोपण,महिला व लहान मुलांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धा तसेच उत्सव काळात “महाराष्ट्र दर्शन” हा सजीव प्रबोधनपर देखावा आणि पारंपरिक वाद्याचा तलवार मंडळाच्या सदस्यांनी सादर केलेले लेझीम, लहान मुलींचे नृत्य या सर्व बाबींचा विचार करून जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार मंडळातून  सांगोला पोलीस ठाणे हद्दीतील श्रीराम गणेश तरुण मंडळ, सांगोला यांनी उत्कृष्ट कार्य करत तृतीय क्रमांक पटकावला.

या यशस्वी निवडीबद्दल मंडळाचा गौरव मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक श्री. प्रीतम यावलकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी प्रदान करून सन्मान करण्यात आला.यावेळी सांगोला पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांचे सह सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचे पोलिस अधिकारी,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

————————————

सन  २०२५ च्या गणेश उत्सवानिमित्त सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळ  पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.यास्पर्धेसाठी  पुढील पाच निकषांवर मूल्यांकन करण्यात आले.१) कलांचे जतन व संवर्धन,२)संस्कृतिक जतन व संवर्धन,३)निसर्ग व सार्वजनिक संपत्तीचे जतन व संवर्धन ४) सामाजिक कार्य ५) गणेश उत्सव आयोजनातील विधायकता ( Dj डॉल्बी मुक्त) प्रत्येक निकषाला २० गुणांचे मूल्य असून, एकूण १०० गुणांच्या आधारे स्पर्धकांची निवड करण्यात आली.तरस्पर्धेअंतर्गत सोलापूर ग्रामीण पोलीस हद्दीतील प्रत्येक पोलीस ठाण्याने तीन-तीन प्रस्ताव सादर केले होते.

————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button