जिल्हा परिषद शाळा मेडशिंगी येथे शासकीय बदलीनंतर शाळेतून कार्यमुक्त झालेले श्री चंद्रकांत बाबर सर यांना सर्व विद्यार्थी पालक व मुख्याध्यापक श्री राजेश गडहिरे सर यांनी जड अंतःकरणाने निरोप दिला तर त्याचे ठिकाणी नव्याने हजर झालेल्या शिक्षिका श्रीमती मनिषा लेंडवे मॅडम यांचे उत्साहात स्वागत केले व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या
यावेळी माता पालक गटाच्या अध्यक्षा सौ मंजुषा कांबळे शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौ अमृता सरगर सदस्या सौ ज्योती राऊत सौ हिना कसबे सदस्य श्री लखन कसबे यांचें सह बहुसंख्य पालक उपस्थित होते