जगातील अनेक देशांची वृद्धत्वाकडे वाटचाल सुरू असताना आपला भारत देश मात्र तरुणांचा देश म्हणून समोर येत आहे. या देशातील युवाशक्तीला योग्य मार्गाला वळवणे अत्यंत गरजेचे आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्या महाराष्ट्रात एलकेपी मल्टीस्टेट, सूर्योदय अर्बन, सूर्योदय अर्बन महिला, सूर्योदय मॉल, वस्त्रनिकेतन आणि फर्निचर मॉल त्याचबरोबर सूर्योदय दूध विभाग यासारख्या अनेक उद्योगातून युवकांच्या हाताला काम देत मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणारा हा सूर्योदय परिवार सामाजिक बांधिलकी जपण्यात देखील त्याहूनही पुढे आहे. असे गौरवोद्गार महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते आणि कवी अविनाश भारती यांनी व्यक्त केले. अनेक मजेदार परंतु चिंतनीय दाखले देत प्रत्येकाच्या जीवनातील गुरूंचे अनन्यसाधारण असलेले महत्त्व त्यांनी विशद केले.

सांगोला येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहामध्ये पंढरपूर,मोहोळ, मंगळवेढा आणि सांगोला या चार तालुक्यातील शिक्षक बंधू-भगिनींच्या विराट गर्दीत सूर्योदय परिवारातील सूर्योदय फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला शिक्षकदिन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात “गुरु हाच खरा जीवनाचा शिल्पकार” या विषयावर ते बोलत होते. यावेळी उपस्थितांच्या आवडीची दखल घेत मधुर आवाजात अनेक कविता सादर करत आपल्या पहाडी आवाजातील मार्गदर्शनाने सर्व उपस्थितांना सुमारे दोन तास त्यांनी अक्षरशः खीळवून ठेवले.

यावेळी मंचावर सूर्योदय फाउंडेशनचे अध्यक्ष अनिलभाऊ इंगवले, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी, ब्रह्मा ग्रुपचे मारुती माळी, सूर्योदय दूध विभागाचे चेअरमन डॉ बंडोपंत लवटे, सूर्योदय उद्योग समूहाचे सहसंस्थापक जगन्नाथ भगत, एलकेपी मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन सुभाष दिघे, पांडुरंग ताटे, विनोद पाटील, प्रशांत पाटील तसेच सूर्योदय महिला अर्बनच्या चेअरमन सौ अर्चनाताई इंगवले, व्हॉ चेअरमन सौ ज्योती भगत संचालिका सौ सुरेखा लवटे सौ मीनाक्षी दिघे, डॉ यशश्री इंगवले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांनी प्रस्ताविकामध्ये एलकेपी मल्टीस्टेट, सूर्योदय अर्बन या संस्थांच्या यशस्वी वाटचाली बाबत माहिती सांगत सूर्योदय ग्रुप मधील अनेक उद्योग व्यवसाय आणि विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम याबाबत माहिती सांगत व्यापक स्वरूपात केलेल्या वृक्ष लागवडी बाबत आणि त्याच्या संवर्धनासाठी शाळा स्तरावरती आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धांबद्दल सखोल माहिती सांगितली. यावेळी बीडीओ कुलकर्णी साहेब, पीआय घुगे साहेब, मारुती माळी साहेब यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.

सूर्योदय फाउंडेशनचे उपाध्यक्ष जगन्नाथ भगत यांनी यावेळी बोलताना सूर्योदयचे विविध उपक्रमाबद्दल माहिती सांगत सूर्योदय वस्त्रनिकेतन आणि फर्निचर मॉल मध्ये या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिक्षकांसाठी तीन दिवसांकरिता दहा टक्के सवलतीची ऑफर सूर्योदयच्या वतीने घोषित केली. सूर्योदय फाउंडेशन च्या वतीने शिक्षकदिन कार्यक्रमाच्या निमित्ताने चार तालुक्यातील सुमारे 91 शिक्षक आणि 19 शाळांना यावेळी पुरस्काराने गौरविण्यात आले. सर्व आदर्श शिक्षकांना आणि आदर्श शाळांना पुरस्कारांचे वितरण मंचावरून मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. सूर्योदय ग्रुपचे देखणे आणि नेटके नियोजन, मन तृप्त करणारा वक्ता, आपुलकीने सेवा देणारा कर्मचारीवृंद आणि सूर्योदयाच्या आवाहनाला प्रतिसाद देत झालेली सारस्वतांची अलोट गर्दी तसेच सर्वांसाठी केलेली स्नेहभजनाची उत्तम सोय यामुळे सन्मान गुरुजनांचा हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.
===========================
सूर्योदय फाउंडेशन च्या वतीने घेतला गेलेला शिक्षकदिन कार्यक्रम अभूतपूर्व असा होता. अत्यंत देखने नियोजन, उपस्थितांचा आदरयुक्त सत्कार, ह भ प अविनाश भारती यांचे अप्रतिम व्याख्यान, छान बैठक व्यवस्था आणि सुग्रास जेवण हे सगळं पाहून आम्ही भारावून गेलो. आमच्या शाळेला सूर्योदय आदर्श प्रशाला पुरस्कार देऊन सन्मानित केले. आम्ही आपले ऋणी आहोत. …. श्री भारत दशरथ जगताप , मुख्याध्यापक.. मनोहर भाऊ डोंगरे माध्यमिक विद्यालय टाकळी सिकंदर. मोहोळ
===========================
खूप सुंदर कार्यक्रम झाला. चार मित्रांनी एकत्र येऊन एवढा मोठा व्याप केला. कितीतरी जणांचे संसार उभे केले. रफी साहेबांनी गायलेले गाण्याच्या दोन ओळी या चार जिवलग मित्रांसाठी… एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तो, ये दिल तुम्हारे प्यार का माना है दोस्तो, बनता है मेरा काम तुम्हारे ही नाम से, होता है मेरा नाम तुम्हारे ही काम से… तुमच्या समाजसेवेला माझा सलाम. सूर्योदय परिवार म्हणजे आमच्यासाठी ऊर्जा आहे….
श्री व्ही वाय पाटील सर. पंढरपूर
===========================
अनिलभाऊ इंगवलेंसह चार जिवलग मित्रांच्या मजबूत खांद्यावर उभ्या राहिलेल्या सूर्योदयच्या वतीने सामाजिक भान आणि कर्तव्याची जाण मनामध्ये ठेवून आम्हा गुरुजनांचा आपण सन्मान केलात. आखीव रेखीव नियोजन, नामवंत वक्ते, मनमिळावू स्टाफ सर्व काही उत्तम. सर्व काही पाहून डोळे, उत्कृष्ट भोजनाने मन आणि खूप काही ऐकून कान तृप्त झाले. धन्यवाद सूर्योदय परिवार . आपल्या उज्वल कार्यास शुभेच्छा..
विनायक मनोहर कलुबर्मे . आदर्श शिक्षक मंगळवेढा.
===========================
कार्यक्रम कसा असावा. याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे सूर्योदय परिवाराचे कार्यक्रम. सूर्योदयाच्या प्रत्येक कार्यक्रमातून काहीतरी वेगळे पाहायला आणि ऐकायला मिळते. या शिक्षक दिन कार्यक्रमांमध्ये आदर्श शाळा आणि शिक्षकांची निवड अतिशय योग्य दिसून आली. आलेल्या प्रत्येक उपस्थितांना काहीतरी भरपूर पदरात पडल्याचं समाधान वाटत आहे. आमचे मन अगदी भरून आले. …
सौ सुवर्ण दिलीप इंगवले. सह्याद्री शैक्षणिक संकुल सांगोला.
===========================
Back to top button