महाराष्ट्र

वाढेगांव विकास सोसायटीच्या चेअरमनपदी योगेश घोंगडे तर व्हा. चेअरमनपदी नवनाथ दिघे यांची बिनविरोध निवड

वाढेगांव – वाढेगांव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी योगेश घोंगडे तर व्हा. चेअरमनपदी नवनाथ दिघे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
वाढेगांव विकास सोसायटीच्या चेअरमन पदावर कार्यरत असणारे डॉ. धनंजय पवार व व्हा. चेअरमन पांडुरंग हजारे यांचा कार्यकाळ संपल्याने दोघांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले होते. या दोन्ही पदाच्या निवडणुका दि. १ आक्टोबर २०२५ रोजी घेण्यात आल्या. त्यामध्ये चेअरमनपदी योगेश घोंगडे व व्हा. चेअरमनपदी नवनाथ दिघे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

 

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक सह अधिकारी अमर गोसावी यांनी कामकाज पार पाडले. संस्थेचे सचिव माणिक देशमुख यांनी निवडणुकीमध्ये सहकार्य केले. वाढेगांव सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन बिनविरोध केली होती. तसेच चेअरमन व व्हा. चेअरमन पदाचा कार्यकाळ ठरवून दिलेला होता. त्याप्रमाणेच आजच्या निवडणुकीत सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेऊन गावाची एकी दाखवली, ही एकतेची भूमिका मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानासाठी निश्चित उपयुक्त ठरेल. म्हणून सोसायटीचे सदस्य वैजिनाथ घोंगडे यांनी सर्वांना धन्यवाद दिले. ही निवडणूक बिनविरोध होणेकामी माजी सरपंच नंदकुमार दिघे, संजय डोईफोडे, डॉ. धनंजय पवार, वसंत दिघे, अशोक दिघे, नारायण दिघे, इरफान मुलाणी, संतोष चौगुले, राजेंद्र ननवरे, दिपक दिघे, विद्यमान उपसरपंच शिवाजी दिघे, धोंडीराम दिघे, अनिल दिघे या सर्वांचे सहकार्य लाभले. यावेळी नूतन चेअरमन व व्हा. चेअरमन यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सोसायटीचे सर्व संचालक, ग्रा. पंचायतीचे सदस्य, सर्व पक्षाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button