सांगोला तालुका प्राथमिक शिक्षकांकडून 788211 पूरग्रस्तांसाठी निधी

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय कुलदीप जंगम साहेब व सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी माननीय कादर शेख साहेब यांनी जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्राथमिक शिक्षकांना आहावान केले त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन
सांगोला तालुक्यातील प्राथमिक शिक्षक बांधवांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी निधी संकलन रक्कम रुपये 7,42,211 रुपये तसेच सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक को-ऑपरेटिव्ह सोसायटी 25,000 व दीपक आबा साळुंखे पाटील प्राथमिक शिक्षक पतसंस्था 21,000 रक्कम असा सांगोला तालुक्याच्या वतीने एकूण निधी 7, 88, 211रुपये जमा केले
सात लाखआठ्या ऐंशीहजार दोनशे अकरा रुपयांचा धनादेश कादर शेख साहेब शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांना सुपुर्त करताना मा सुयोग नवले गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सांगोला व केंद्रप्रमुख मलया मठपती केंद्रप्रमुख हमजू मुलाणी केंद्रप्रमुख अंकुश वाघमोडे या कामी तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना केंद्रप्रमुख शिक्षक व तालुका सोसायटी व दीपक आबा सोसायटी यांनी चांगले सहकार्य केले असल्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी शिक्षणअधिकारी साहेबांना सांगितले



