माता बालक प्रतिष्ठान संचलित, उत्कर्ष माध्यमिक विद्यालय सांगोला या विद्यालयाने सोलापूर जिल्हा परिषद व सांगोला तालुका क्रीडा संकुल समिती सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 18 /9 /2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धेमध्ये उत्कर्ष विद्यालय येथील विद्यार्थिनी कु .अक्षरा रमेश जाधव इयत्ता दहावी या विद्यार्थिनीने सतरा वर्षीय मुलींमध्ये जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळवला.
याबद्दल सर्व संस्था पदाधिकारी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुनील कुलकर्णी सर, पर्यवेक्षक मिसाळ सर ,भोसले सर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका बनसोडे मॅडम, उपमुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम यांनी या विद्यार्थिनीचे तसेच या विद्यार्थिनीस मार्गदर्शन करणारे क्रीडाशिक्षक गोतसूर्य सर व कुंभार सर यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.