सांगोला तालुका

अन्नप्रक्रिया उद्योग स्थापन करून युवकांनी आत्मनिर्भर व्हावे :श्री शिवाजी शिंदे

दिनांक 18 नोव्हेंबर 2022 रोजी विज्ञान महाविद्यालय सांगोला संस्थात्मक नव संशोधन केंद्र व incubation सेंटर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने “सोलापूर स्टार्टअप यात्रा: ध्यास नाविन्याचा शोध नव उद्योजकांचा” या अभिनव उपक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत असताना सांगोला तालुक्याचे कृषी अधिकारी श्री शिवाजी शिंदे साहेब यांनी अन्नप्रक्रिया उद्योग स्थापन करून युवकांनी आत्मनिर्भर व्हावे असे प्रतिपादन केले. त्याचबरोबर केंद्र शासन व महाराष्ट्र राज्य शासन यांच्या विविध योजनांची माहिती दिली. शेतीपूरक वेगवेगळ्या व्यवसायाची अन्नप्रक्रिया उद्योग संदर्भामध्ये युवकांनी सामील व्हावे असे त्यांनी युवकांना आवाहन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माननीय विठ्ठलराव शिंदे साहेब यांनी मनोगतामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी सांगोला तालुक्यातील युवकांना योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याचे सांगितले. 103 गावाचा समावेश असलेला सांगोला तालुका कृषी प्रधान असून दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यामध्ये डाळिंब व बोर उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. या फळांवर प्रक्रिया करून काही उद्योग निर्माण करता येते का यासाठी सोलापूर विद्यापीठ सोलापूर विज्ञान महाविद्यालय इंक्युबॅशन सेंटर आणि तालुक्यातील कृषी विभाग यांनी एकत्रित येऊन तालुक्यातील युवकांना आत्मनिर्भर बनवणे चे आव्हान त्यांनी केले त्याचबरोबर सदर अभिनव उपक्रम सतत राबवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमांमध्ये विद्यापीठ सेंटरचे डायरेक्टर डॉक्टर सचिन लड्डा साहेब यांनी प्रशिक्षक म्हणून उपस्थित नागरिक व विद्यार्थ्यांना विविध उद्योग व त्या संबंधित असलेल्या कल्पना कशा नाविन्यपूर्ण राबवल्या जातील व त्यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा कसा उपयोग करता येईल याबाबत विस्तृत माहिती उपस्थितांना दिली.
सदर सोलापूर स्टार्टअप यात्रेमध्ये मी उद्योजक बोलतोय या सत्रामध्ये मातोश्री पेढा उद्योग समूहाचे डायरेक्टर श्री माणिक राजाराम मराठे साहेब यांनी आपल्या उद्योगाची निर्मिती कशी झाली त्याचा विकास कसा झाला याबाबत प्रेरणादायक अशी माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. ऍग्रो फूड प्रायव्हेट लिमिटेड चे सीईओ माननीय श्री विवेकानंद मारुती घेरडे यांनी आपल्या उद्योगाबाबत उपस्थितांना माहिती देऊन मार्गदर्शन केले. सोनद गावामध्ये स्थापन झालेल्या प्रभू मसाले उद्योग केंद्राचे सीईओ श्री ब्रह्मदेव विठ्ठल बाबर साहेब यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना उद्योग निर्माण करताना येत असलेल्या अडचणी व त्याचे निराकरण कसे करावे याबाबत माहिती दिली. श्रेयस दुग्धालय समूहाच्या सीईओ सौ ज्योती संभाजी माळी यांनी उपस्थित विद्यार्थिनींना व नागरिकांना एक महिला उद्योजक कशी होऊ शकते याबाबत प्रेरणादायक असे मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रघुनाथ फुले सरांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रथम सत्रा मध्ये माजी नगरसेवक श्री दीपक चौथे साहेब व सांगोला तालुक्यातील कृषी विभागाचे सहाय्यक अधिकारी श्री बाळासाहेब सावंत यांनी विविध व्यवसायाच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास नागरिक, विविध महाविद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते.

तसेच कार्यक्रमाच्या द्वितीय सत्राचे प्रस्ताविक विज्ञान महाविद्यालय इंक्युबॅशन सेंटरचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर मनोज कुमार माने यांनी केले. या सत्रा मध्ये नऊ उद्योग प्रस्ताव उपस्थितांपुढे नऊ उद्योजक होऊ इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सादर केले. यामध्ये पशु आहार खाद्य उत्पादन प्रकल्प, दूध पावडर उत्पादन प्रकल्प, शेळी मेंढी आहार, उत्पादन प्रकल्प, पीओपी शीट उत्पादन प्रकल्प, सेंद्रिय गुळ उत्पादन प्रकल्प, कडधान्यापासून नैसर्गिक रित्या बनवण्यात आलेले साबण उत्पादन प्रकल्प, इलेक्ट्रॉनिक डिफेन्सिव्ह वुमन चिप्स प्रकल्प, कृत्रिम फुले डेकोरेशन मटेरियल उत्पादन प्रकल्प, ऍग्रो वेस्ट बायोमास उत्पादन प्रकल्प, सादर केले गेले. सदर कार्यक्रमास श्रीनिवास पाटील सर व श्रीनिवास नलगेशी सर यांनी नवउद्योग कल्पना कशा असाव्यात याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सोलापूर स्टार्टअप यात्रेमुळे सांगोला तालुक्यातील नागरिकांमध्ये तसेच युवकांमध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी जनजागृती चे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक अशोक कांबळे सर यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंक्युबॅशन सेंटरचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर शुद्धोधन कदम सर, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!