राज्यस्तरीय खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अजनाळे येथे आयोजन…
अजनाळे: भारतरत्न, विश्वरत्न, परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त अजनाळे ता सांगोला येथे रविवार दि 28 एप्रिल 2024 रोजी साय 6 वाजता राज्यस्तरीय खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती मंडळाच्या संयोजकांनी दिली.
प्रथम क्रमांक बक्षीस 15 हजार रू युवा नेते माजी सरपंच विष्णू शंकर देशमुख यांच्याकडुन तर द्वितीय क्रमांक बक्षीस 10 हजार रु उद्योगपती शशिकांत विठ्ठल येलपले तर तृतीय क्रमांक बक्षीस 7 हजार युवा नेते नितीन भाऊ रणदिवे चतुर्थ क्रमांक बक्षीस 5 हजार रु ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत साहेबराव चंदनशिवे तर उत्तेजनार्थ 3333 हजार रु सुनिल फ्रुट सप्लायर्स चे मालक सुनिल बबन धांडोरे यांच्याकडून देण्यात येणार आहे. सर्व विजेत्या स्पर्धकांसाठी जे. के एंटरप्राइजेस यांच्या वतीने चषक देण्यात येणार आहेत.
तरी या स्पर्धेसाठी नाव नोंदणीसाठी पत्रकार सचिन धांडोरे 9834473615, समाधान धांडोरे 7507775948, आप्पाराव धांडोरे सर 9890574899,डॉ धांडोरे 9970449107 सर्जेराव धांडोरे यांच्याशी संपर्क साधावा असे आवहान डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ अजनाळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.