उत्कर्ष प्राथमिक विद्यालय, सांगोला येथे उन्मेष छंदवर्गाचा समारोप उत्साहात संपन्न

ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते* आपले ज्ञान दुसऱ्याला द्यावे व दुसऱ्याच्या चांगल्या गोष्टी आपण आत्मसात कराव्यात त्यामुळे आपल्या ज्ञानात वाढ होते. विद्यार्थ्यांनी छंद वर्गात मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग स्वतःबरोबर इतरांनाही द्यावे.तसेच आपली संगत जर चांगली असेल तर आपला उत्कर्ष होतो. कसे वागायचे आपल्याला चांगल्या सवयी कशा लावून घ्यायच्या हे बोधात्मक गोष्टीतून सांगण्यात आले. असे सर्व विचार माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्या *दिनांक 23/ 4 /2024 मंगळवारी उत्कर्ष प्राथमिक विद्यालयाच्या प्रांगणामध्ये झालेल्या छंद वर्गाच्या समारोपप्रसंगी संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉ.शालिनीताई कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळेला व्यासपिठावर पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुनीताताई कुलकर्णी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विश्रांती ताई मागाडे उपस्थित होत्या. तसेच पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सुनिताताई यांनीही विद्यार्थ्यांना छान मार्गदर्शन केले.
अभ्यासाने आलेली मरगळ दूर करण्यासाठी व इतर कला आत्मसात करण्यासाठी उत्कर्ष प्राथमिक विद्यालयात *दिनांक :-10 एप्रिल ते 23 एप्रिल* पर्यंत इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी छंद वर्गाचे आयोजन केलेले होते. या छंद वर्गात प्रार्थना,रंगछटा,बौद्धिक व शारीरिक खेळ, कागदकाम, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवणे,या कला शिकवल्या गेल्या. हे सर्व करताना मुलांना खूप आनंद होत होता. तसेच या छंदवर्गामध्ये सांगोला येथील ध्यानमंदिर येथे विद्यार्थ्यांच्या आध्यात्मिक सहलीचे आयोजन केले होते. या ठिकाणी विद्यार्थ्यांना गोंदवलेकर महाराज व समर्थांच्या गोष्टी शुभांगीताई कवठेकर यांनी सांगितल्या.
मुलांन कडून मनाचे श्लोक म्हणून घेतले. विद्यार्थ्यांना माननीय श्री राजू पाटील व श्री राजू कुलकर्णी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले . व त्यांनी विद्यार्थ्यांना खाऊ दिला.
समारोपाच्या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्याला आलेले अनुभव व छंद वर्गात प्रत्येक गोष्ट करत असताना मिळालेला आनंद आपल्या मनोगतातून मुक्तपणे व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा रास्ते यांनी केले.
सदरचा हा छंदवर्ग प्रशालेच्या मुख्याध्यापिका विश्रांतीताई मागाडे उपमुख्याध्यापिका स्वराली ताई कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उन्मेष छंदवर्गाच्या प्रमुख सुनीता नकाते, वर्षा रास्ते तसेच सर्व शिक्षक
यांनी उत्तम रीतीने पार पाडला.