अज्ञात चोरट्याने सांगोला शहरातील दोन दुकाने फोडली

सांगोला (प्रतिनिधी) अज्ञात चोरट्याने वह्या, पुस्तकाचे स्टेशनरी दुकान व कृषी पूरक दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानातील चिल्लर व रोख पाच हजार रुपये चोरून नेल्याची घटना शनिवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी म. फुले चौक, सांगोला येथे घडली आहे.
सांगोला शहरातील स्टेशन रोडवरील म.फुले चौक येथे  विनवर्ड स्टेशनरी व ओम अग्रो एजन्सी या नावाची दुकाने आहेत  शुक्रवार दि.18 नोव्हेंबर रोजी दोन्ही दुकान मालकांनी आपापली दुकाने बंद करून घरी गेले व शनिवार दिनांक 19 रोजी सकाळी  आठ वा.च्या सुमारास दुकाने उघडण्यासाठी आले असता दुकानाच्या शटरची कुलपे तुटलेली दिसून आली विजय कोळेकर यांनी आपल्या दुकानात जाऊन पाहिले असता दुकानातील गल्ल्यामध्ये ठेवलेले चार हजार रुपये रोख व चिल्लर असे एकूण पाच हजार रुपये चोरीस गेल्याचे निदर्शनास आले याबाबत त्यांनी सांगोला पोलिसात फोन केला व घडलेली हकीकत सांगितली घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल डी के वजाळे व वाघ यांनी दुकानाची पाहणी केली व दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली आहे याबाबत विजय कोळेकर यांनी अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटरची कुलपे तोडून दुकानात प्रवेश करून दुकानातील सुमारे रोख पाच हजार रुपये चोरून  नेल्याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button