इनरव्हील क्लब ऑफ सांगोला यांचे तर्फे माळवाडी येथे आरोग्य विषयक शिबिर संपन्न.
इनरव्हील क्लब ऑफ सांगोला यांच्यातर्फे माळवाडी येथे संत सावतामाळी मंदिरामध्ये महिलांना आरोग्य विषयक माहिती व टी टी इंजेक्शन देण्यात आली. सदर शिबिर आपल्या संस्थेचे पास्ट प्रेसिडेंट सुनंदाताई माळी यांच्या नवीन सुनबाई डॉ.आश्विनी बिपिन माळी यांनी घेतले .प्रस्तावना मंगल लाटणे यांनी केली.
डाॅ. अश्विनी माळी यांनी महिलांना आरोग्यविषयक माहिती सांगितली. त्यामध्ये महिलांनी शिळे अन्न खाणे, त्याच्यामुळे त्यांचं अन्नपचन होत नाही. आणि त्यामुळे आजार होतात. सकाळी उठले की चहा पिला जातो, त्याच्या ऐवजी खजूर लाडू ,शेंगदाणा लाडू त्यांनी खाल्ला पाहिजे. उपवास केल्यामुळे वजन वाढते त्याच्यामुळे उपवास न करता व्यवस्थित आहार घेतला पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी स्त्रियांचे तीन गट पाडून कोणत्या वयोमानाच्या गटात काय आजार होऊ शकतात व त्यावरील उपाय योजना सांगण्यात आल्या . तसेच महिलांनी आहाराबरोबर व्यायाम सुद्धा केला पाहिजे याबाबतची माहिती दिली. महिलांना काम करताना काही जखमा झालेल्या असतात त्या जखमेनचे इन्फेक्शन होऊ नये म्हणून उपस्थित महिलांना टी टी ची इंजेक्शन देण्यात आली.
सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी डॉ. सौ अश्विनी बिपिन माळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमासाठी इनरव्हील क्लब ऑफ सांगोलाचे अध्यक्षा उमा उंटवाले ,पास्ट प्रेसिडेंट सौ मंगल लाटणे, सौ लतीका माळी, सौ माधुरी गुळमिरे, सुनंदा माळी तसेच क्लबचे ट्रेझरर वर्षा बलाक्षे. व सभासद अंजना बनकर उपस्थित होते. आभार क्लबच्या पास्ट प्रेसिडेंट सौ माधुरी गुळमिरे यांनी केले.