सांगोला शहरात हजरत टिपू सुलतान जयंती मोठ्या उत्साहात साजरी

सांगोला(गुलामगौस तांबोळी ):- स्वातंत्र्यसेनानी, इंग्रजांविरुद्ध पहिला लढा देऊन इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे शेर -ए- हिंद शहिद हजरत टिपू सुलतान यांची जयंती सांगोला शहरात मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. २० नोहेंबर रोजी कडलास नाका सांगोला येथे हजरत टिपू सुलतान यांच्या प्रतिमेस पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. व हजरत टिपू सुलतान यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला.

यानंतर सर्व लोकांना जिलेबीचे वाटप करण्यात आले. २१ नोहेंबर रोजी सांगोला शहरातून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी हजरत टिपू सुलतान यांच्या प्रतिमेस नायब तहसीलदार किशोर बडवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यानंतर ही शोभायात्रा सुरू करण्यात आली.
यावेळी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख, मा. नगरसेवक आनंदा माने, राजू मगर, जुबेर मुजावर, आलमगीर मुल्ला, इंजि. रमेश जाधव, तोहिद मुल्ला, हाजी महंमदगौस नाडेवाले, कादिर इनामदार, कमरुद्दिन खतीब, फिरोज खतिब, तोफिक मुजावर, मोहसीन मुजावर, मोहसीन खतीब, साहिल खतीब, पत्रकार गुलामगौस तांबोळी, निसार मुलाणी, जमीर मुजावर, कमरुद्दीन काझी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa