सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

डोंगरगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत साखळी उपोषणास सुरुवात.

सांगोला तालुक्यातील डोंगरगाव येथे आज मराठा योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी पुकारलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी डोंगरगाव येथे सकल मराठा समाज वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन तीव्र करण्याचा प्रयत्न करीत आहे.
डोंगरगाव येथे मराठा समाजाने दि.27 ऑक्टोंबर पासून सर्व नेत्यांना गावात प्रवेश बंद केलेला असून कॅन्डल मार्च ही सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन यशस्वी केला. त्याचबरोबर आज दिनांक एक नोव्हेंबर 2023 पासून सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत साखळी उपोषणास सुरुवात झालेली असून पहिल्याच दिवशी डोंगरगावच्या सरपंच प्रथम नागरिक सौ सुरेखा तानाजी बाबर त्यांच्या पतीसह व श्री भास्कर रामहरी कदम हे त्यांच्या पत्नीसह उपोषणास बसलेले आहेत.
या उपोषणास डोंगर गावातील सर्व समाजाचा खूप मोठा पाठिंबा असून सर्व इतर समाजातील बांधवही या बेमुदत साखळी उपोषणात सहभागी झालेले आहेत. या उपोषणा ठिकाणी गाव कामगार तलाठी श्रीमती अन्सारी मॅडम वयांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!