अनकढाळ व परिसरातील 25 किलोमीटर अंतरावरील गावासाठी टोल माफी करा -डॉ बाबासाहेब देशमुख

नाझरे (प्रतिनिधी):- नितीन भाऊ रणदिवे व त्यांच्या मित्र परिवाराने अनकढाळ टोलनाका 25 किलोमीटर परिसरातील वाहनांना टोलमाफी करा ही मागणी बरोबर असून प्रशासनाने ती मान्य करावी अन्यथा आज जसे आंदोलन झाली तसे यापुढेही होणार व होणाऱ्या टोल नुकसानी प्रशासन जबाबदार राहील तरी टोल माफ करा असे मत शेकाप प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख यांनी आंदोलनकर्त्यांसमोर व्यक्त केले
यावेळी दीपक ऐवळे, गुळीग गोडसे यांनीही आम्ही आज शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत असून यापुढे या परिसरातील किमान 25 किलोमीटरच्या आतील सर्व वाहनधारकांना टोलमाफी करा अन्यथा आंदोलन तीव्र करू असे सांगितले
सदर प्रसंगी नितीन भाऊ रणदिवे यांच्या हस्ते प्रशासनास निवेदन देण्यात आले यावेळी या निवेदनाचा विचार करून निर्णय घेऊ तसेच केंद्र शासन व राज्य शासन यांनानिवेदन पाठवू असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले तसेच आमदार खासदार यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन देऊ असे नितीन भाऊ रणदिवे यांनी सांगितले व गोरगरीब वाहन चालकाचे यामधून सुटका करा असे सांगितले
यावेळी सुबराव बंडगर रवी मेटकरी दिघंची आटपाडी नाझरे परिसरातील वाहनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वाहनधारकांची मोठी लाईन लागली होती तसेच पोलीस उपनिरीक्षक पोपट काशीद व त्यांच्या टीमने चोख बंदोबस्त ठेवला होता