*शरदचंद्रजी पवार यांना प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांची सदिच्छा भेट

सांगोला (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांची प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी गोविंद बाग बारामती येथे नुकतीच सदिच्छा भेट घेतली.व विविध विषयावर चर्चा केली.
थोर स्वातंत्रसेनानी, देशभक्त, सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संस्थापक अध्यक्ष पिताश्री चं.वि तथा बापूसाहेब झपके यांचा ‘ कर्म सेवामय झाले की आयुष्य कृतार्थ होते ‘ हा विचार प्रमाण मानून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रांतिक सदस्य,महाराष्ट्र वीरशैव सभा प्रांतिक अध्यक्ष, सांगोला नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष,आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब ३२३४ड-१ प्रांतपाल २००९-१०,सां.ता.शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष व विद्यामंदिर शैक्षणिक संकुले, लायन्स क्लब ,महाराष्ट्र साहित्य परिषद, नगर वाचन मंदिर सांगोला या शाखांचे मार्गदर्शक म्हणून कार्य करताना प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी शैक्षणिक, सामाजिक साहित्यिक, राजकीय व इतर विविध क्षेत्रात आपल्या उल्लेखनीय व विधायक कार्याने वेगळेपण निर्माण केले.
समाजाला प्रेम आणि विश्वास देऊन समाजाच्या अभ्युदयासाठी जगातील २०० हून अधिक स्वतंत्र देशात ४५५०० पेक्षा जास्त शाखा असणा-या लायन्स आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये क्लब अध्यक्ष पासून प्रांतपाल या प्रांतातील सर्वोच्च पदी सेवाभावी वृत्तीने सांगोला लायन्स क्लबच्या माध्यमातून १९७८ पासून अमोघ कार्य सुरू ठेवले आहे.व वेगवेगळे समाजहितासाठी उपक्रम हाती घेतले. त्याचा अनेकांना फायदा होताना दिसतो आहे. याच पद्धतीने लायन्स उपविभाग पाच प्रांत ३२३४ड१ विभाग १ मधील एका समारंभासाठी शरदचंद्रजी पवार यांची भेट घेतली व सविस्तर चर्चा केली. तेव्हा त्यांना ‘ एका ग्रेट व्यक्तित्वाची ग्रेट भेट’ असा प्रत्यय आला.
यावेळी लायन्स उपविभागीय सभापती ला.प्रा.धनाजी चव्हाण, पत्रकार जगन्नाथ साठे उपस्थित होते.