सांगोला विद्यामंदिर मध्ये सीईटी, नीट,जेईई संदर्भात विद्यार्थी-पालक शिक्षक सभा..

सांगोला (प्रतिनिधी) सांगोला व सांगोला परिसरामध्ये माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी व विद्यार्थ्यांना गुणात्मक व रचनात्मक शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने कै. गुरुवर्य चं. वि. तथा बापूसाहेब झपके यांनी १९५२ मध्ये सांगोला विद्यामंदिरची स्थापना केली. स्थापनेपासून विद्यामंदिर गुणवत्तेत अग्रेसर आहे. सद्यस्थितीला बारावीनंतर घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना यश मिळावे हा हेतू ठेवून सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज सांगोला सीईटी मार्गदर्शन वर्ग व इयत्ता दहावी ( एस एस सी) परीक्षा दिलेल्या सांगोला तालुका व इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी करियर गाईडन्स व सीईटी,नीट,जेईई या परीक्षेसाठी फाउंडेशन कोर्स या संदर्भात विद्यार्थी व पालकांसाठी सभा संपन्न झाली.
यावेळी व्यासपीठावर प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्य शहिदा सय्यद, पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, बिभिषण माने,प्रा.प्रकाश म्हमाणे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपप्राचार्य शहिदा सय्यद यांनी प्रास्ताविकातून सांगोला विद्यामंदिरच्या उज्ज्वल यशाचा पंरपरा सांगत गेल्या वर्षीच्या सीईटीचा निकाल, बोर्ड परीक्षेचा निकाल याबद्दल माहिती दिली. शिक्षक मनोगतामध्ये श्री. शिवाजी चौगुले सर यांनी दहावी नंतर काय याबद्दल वेगवेगळ्या शाखेची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी योग्य तो निर्णय घेण्यासाठी उज्ज्वल यशाची त्रिसूत्री सांगितली. त्यानंतर ज्युनिअर कॉलेजचे प्रा. मिलिंद देशमुख यांनी सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजमध्ये राबवल्या जाणाऱ्या सीईटी वर्गाबद्दल माहिती दिली.
या सीईटी वर्गासाठी तयारी म्हणून फाउंडेशन कोर्स विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजमध्ये सुरू होत आहे त्याबद्दल माहिती दिली. हा कोर्स एक एप्रिल २०२४ ते २० मे २०२४ या कालावधी दरम्यान सुरू राहील.असे सांगितले.यावळी अध्यक्षीय भाषणात या फाउंडेशन कोर्सचा लाभ सांगोला तालुका व परिसरातील विद्यार्थ्यांनी करून घ्यावा असे आवाहन प्राचार्य गंगाधर घोंगडे यांनी केले.या सभेसाठी ७१ विद्यार्थी व पालक यांच्यासह सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.माधुरी पैलवान यांनी केले तर प्रा.उल्हास यादव यांनी आभार प्रदर्शन केले.