politicalmaharashtrasangola

महायुतीचे सरकार सर्वसामान्यांचे असून, त्यांच्या हिताचे निर्णय घेणारे आहे- आमदार शहाजीबापू पाटील

 

सांगोला (प्रतिनिधी): खरीप हंगामात दुष्काळामुळे शेती पिकांचे नुकसान झाले असून सांगोला तालुक्यातील १ लाख १९ हजार ३४२ बाधित शेतकऱ्यांना १५७ कोटी ०७ लाख ६७ हजाराचा मदत निधी प्राप्त झाला आहे. सदरचा निधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. शेतकऱ्यांनी आता ई केवायसी अपडेट करून संबधित तलाठ्याकडे सात बारा उतारा, आठ अ उतारा, बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स प्रत, आधारकार्डची पूर्तता करून दुष्काळ निधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले आहे. दुष्काळामुळे बाधित शेतकऱ्यांना हा मदत निधी उपलब्ध होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महायुतीचे सरकार सर्वसामान्यांचे असून, त्यांच्या हिताचे निर्णय घेणारे आहे. संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहणारे हे महायुतीचे सरकार आहे, असे मत आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले.

 

आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे खरीप हंगाम-२०२३ मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी बाधित शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीपोटी सांगोला तालुक्यातील १ लाख १९ हजार ३४२ शेतकऱ्यांना १५७ कोटी ०७ लाख ६७ हजारांची मदत मिळणार आहे. सांगोला तालुक्यात २ हेक्टर मर्यादेत ४४ हजार ०६७ हेक्टर जिरायत, २१ हजार ५४३ हेक्टर बागायत, १४ हजार १९९ हेक्टर बहुवार्षिक पिके असे ७९ हजार ८१० हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते. २ ते ३ हेक्टर मर्यादेत २४ हजार ०६५ हेक्टर जिरायत, १० हजार ३६१ हेक्टर बागायत, ५ हजार ७६७ हेक्टर बहुवार्षिकपिके असे ४० हजार २९३ हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते. २ हेक्टर मर्यादेत (२२४५- २४३४) ३ हजार ७४५ हेक्टर जिरायत, ३ हजार ६६२ हेक्टर बागायत, ३ हजार १९४ हेक्टर बहुवार्षिकपिके असे १० हजार ६०३ हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते. २ ते ३ हेक्टर मर्यादेत (२२४५-२१६७) २ हजार ९४५ हेक्टर जिरायत, १ हजार ७६१ हेक्टर बागायत, १ हजार २९७ हेक्टर बहुवार्षिकपिके असे ५ हजार १०४ हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रयत्नाला यश आले असून दुष्काळात शेतकऱ्यांना मदत देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी सातबारा उतारा, आठ अ उतारा, आधारकार्डची झेरॉक्स प्रत व बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स यांची तलाठी मंडळ अधिकारी यांच्याकडे पूर्तता करावी. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी आधार कार्डला बँक खाते त्याचबरोबर मोबाईल नंबर आणि इतर सर्व कागदपत्राची पूर्तता करून दुष्काळ निधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!