फॅबटेक इंजिनिअरिंगचे विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न
सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि रिसर्च मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामजिकमुल्य व श्रमप्रतिष्ठा रूजवण्यासाठी विविध उपक्रम नेहमी आयोजित केले जातात. या वर्षी या योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत चिंचोली ता.सांगोला.जि. सोलापूर येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन दि. २२ ते २८ मार्च दरम्यान करण्यात आले होते,अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा राहुल पाटोळे व समन्वयक प्रा. कुबेर ढोपे यांनी दिली .
चिंचोली ग्रामपंचायती चे सरपंच मा.श्री.दत्तात्रय बेहरे (नाना) यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.शिबिराच्या दरम्यान जनजागृती विषयी विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत ग्रामपंचायत परिसर, खंडोबा मंदीर परिसर तसेच अंतर्गत जोड रस्ते स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सर्व स्वय्यंसेवकांनी गावामध्ये जनजागृती दिंडी द्वारे स्त्री भृण हत्या,व्यसनमुक्ती ,पाणी वाचविण्यासाठी तसेच स्वच्छतेचे महत्व या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार केला. त्याबरोबर त्यांना व्यसनापासुन दूर राहण्याचा व निरोगी आयुष्य जगण्यासाठी आवश्यक आहार तसेच संतुलीत व्यायाम यांचे महत्व पटवून दिले.
हे विशेष श्रमसंस्कार शिबिर संस्थेचे चेअरमन मा.श्री.भाऊसाहेब रुपनर व मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर, कार्यकारी संचालक मा.श्री.दिनेश रूपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, संचालक डॉ. डि.एस.बाडकर, इंजिनिअरिंग चे प्राचार्य डॉ.रविंद्र शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.