न्यू इंग्लिश स्कूलच्या निसर्ग फुले ची जवाहर नवोदय विद्यालयात निवड
सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल या नामांकित शाळेतील इयत्ता पाचवी मधील निसर्ग चैतन्य फुले या विद्यार्थाची जवाहर नवोदय विद्यालय पोखरापूर येथे निवड झाली असून त्याबद्दल त्याचा व त्याच्या पालकांचा सत्कार न्यू इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक प्रा.नामदेव कोळेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक प्रा.अशोकराव शिंदे उपप्राचार्य प्रा.केशव माने ,पर्यवेक्षक तानाजी सूर्यगंध,दशरथ जाधव उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शक शिक्षक निलोफर मुजावर मॅडम,कविता शिंदे मॅडम,दिनेश बागुल सर,किरण पवार सर यांचाही सन्मान करण्यात आला.
सदरच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख(माध्यमिक) स्मिता इंगोले मॅडम यांनी केले तर आभार सचिन हजारे सर यांनी मानले. सदरच्या यशाबद्दल संस्था सचिव विठ्ठलराव शिंदे सर ,संचालक डॅा.अशोकराव शिंदे सर,दिपक खटकाळे सर व जयंत जानकर सर यांनी निसर्ग फुले याचे विशेष कौतुक करून त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.