फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेजच्या ४ विद्यार्थ्यांची जी. ई. एरोस्पेस, पुणे या कंपनीत निवड
सांगोला: कॅम्पस प्लेसमेंट मध्ये जिल्ह्यात अग्रेसर असणाऱ्या फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज मधील ४ विद्यार्थ्यांची जी. ई. एरोस्पेस, पुणे या कंपनीत निवड झाल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. धनंजय शिवपुजे यांनी दिली .कंपनीच्या निवड समितीने चाळणी परीक्षा व मुलाखती द्वारे मेकॅनिकल विभागातील ज्ञानेश्वरी गावडे, सागर भोसले, महेश राऊत आणि शिवम लोखंडे या विद्यार्थ्यांची निवड केली.
जी.ई एरोस्पेस सारख्या नामांकित कंपनी मध्ये झालेली विद्यार्थ्यांची निवड म्हणजे फॅबटेक ची असणारी तंत्रशिक्षणातील गुणवत्ता व दर्जा याचा परिपाक असल्याचे पॉलिटेक्निक चे प्राचार्य प्रा. तानाजी बुरुंगले यांनी सांगितले . निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन श्री. भाऊसाहेब रुपनर , मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर , कार्यकारी संचालक श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटे मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. दत्तात्रय नरळे यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.