नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलना निमित्त आर्ट एक्सिबिशनचे उदघाटन

नाझरा(वार्ताहर):-नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये आज वार्षिक स्नेहसंमेलना निमित्त आर्ट एक्सिबिशनचचे उद्घाटन श्री. राजेंद्र जाधव सर ( सांगोला विद्यामंदिर प्रशाला ,सांगोला .कला शिक्षक ) , व महेश विभुते (नाझरा),अमोल बाबर(चोपडी) या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इंग्लिश मेडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ सिमरन काझी मॅडम, नाझरा विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अमोल गायकवाड सर , पर्यवेक्षक मधुकर धायगुडे सर आदी मान्यवर उपस्थित होते. .सदर कार्यक्रमाचे आभार श्री पाटील सर यांनी मांडले तर सूत्रसंचालन कु . अश्विनी माळी मॅडम यांनी केले.
कला विभाग प्रमुख श्री अश्वजीत जाधव सर तसेच कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी इंग्लिश मेडीयम मधील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.