इटकी येथील जलजीवन मिशन अंतर्गत कामाची चौकशी करावी
गटविकास अधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी

सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला तालुक्यातील इटकी येथील जलजीवन मिशन अंतर्गत कामाची चौकशी करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य धुळा कर्चे, दादा वाघमारे व महादेव सावंत यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
इटकी येथील जलजीवन मिशन अंतर्गत सध्या जे काम चालु आहे ते निकृष्ट आहे. तसेच पाईप 1 ते 2 फुटावर पुरण्यास चालु केली आहे. त्याच्या मोजमापाप्रमाणे काम सुरु नाही. तसेच यापुर्वीची ग्रामपंचायतीची 2 कि.मी. काम जुनी सुस्थितीत असलेली पाईपची मोडतोड केली आहे. त्यामुळे शासनाच्या पाईपचे नुकसान केले आहे. सदरचे काम हे निकृष्ट दर्जाचे आहे.
तसेच सदरचे निकृष्ट दर्जाचे आहे. शासन नियमानुसार नाही. वाळु माती मिश्रीत आहे, वाळुमध्ये डस्ट आहे. सिमेंट क्वालीटी ओ पी सी नाही. तसेच जी पाईप ची चारी ही रोडच्या हददीतुनच काम चालु आहे. तरी याची चौकशी होवून शासन नियमाप्रमाणे व ग्रामपंचायतीची सुस्थितीत जी पाईप लाईन आहे तशीच ठेवावी. व या कामाची चौकशी करावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे
सदर निवेदनाच्या प्रती कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जि.प.सोलापूर, उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग सांगोला यांना देण्यात आल्या आहेत.