सांगोला तालुकामनोरंजनमहाराष्ट्र

सांगोल्यात रोषणाईच्या झगमगाटात गरबा दांडियाचा जल्लोष..!

सांगोला ( प्रतिनिधी): रोषणाईच्या झगमगाटात उजळलेले मैदान… रंगीबेरंगी ट्रॅडिशनल कपड्यांमधील तरुण व तरुणींची गर्दी….लेझर शोसह फटाक्यांची आतषबाजीत भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत मित्र परिवाराच्या वतीने छ.शिवाजीनगर नवरात्रोत्सव मंडळ, छ. शिवाजीनगर सांगोला संचलित पहिल्या-वहिल्या दांडिया गरबा नाईट स्पर्धेत तरुणी, महिलांची पाऊले थिरकली. नृत्यरसिकांची यावेळी मोठी गर्दी उसळलेली दिसली. रोषणाईच्या झगमगाटात गरबा दांडियाचा जल्लोष साजरा केला जात होता. दांडिया गरबा खेळण्यासाठी तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले होते.
         भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत मित्र परिवाराच्या वतीने छ.शिवाजीनगर नवरात्रोत्सव मंडळ, छ. शिवाजीनगर यांच्या वतीने सांगोल्यात सांगोला पहिल्या-वहिल्या दांडिया गरबा नाईट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दांडिया गरबा नाईट स्पर्धेत सर्वोत्कृष्ट दांडिया जोडी प्रणोती सौरभ देशपांडे, सायली सुयोग दिवटे, सर्वोत्कृष्ट गरबा जोडी अजय खरात दीक्षा खरात, सर्वोत्कृष्ट दांडिया ग्रुप प्रिया पटेल, पल्लवी बेले, प्रिया कमलापुरकर, वैशाली सावंत, सर्वोत्कृष्ट गरबा ग्रुप तृप्ती बेंगलोरकर, तनुजा थोरात – मिसाळ, ललिता चौधरी, आरती बेंगलोरकर, निकिता बेगलोरकर, साक्षी वसेकर, मोनिका बाबर, अन्वी सुरवसे विजेत्या ठरल्या. तर लकी डॉ स्पर्धेत पहिल्या दिवशी मुक्ता पतंगे (आटा चक्की), हेमा माळगे (मायक्रो ओव्हन), माधुरी पवार ( मिक्सर) विजेत्या ठरल्या. दुसऱ्या दिवशी पूजा बोबनाळे (मोबाईल), अश्विनी कांबळे (मोबाईल), अश्विनी इंगोले ( मोबाईल) विजेत्या ठरल्या. तिसऱ्या दिवशी लता येलपले (पैठणी), कल्याणी राऊत (पैठणी), मंगल चौगुले (पैठणी) विजेत्या ठरल्या.
     शहर व ग्रामीण भागातून अनेक तरुण व तरुणींचे समूह स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दाखल झाले होते. तीन दिवस रात्री बारापर्यंत दांडियाचा आवाज घुमला. याबरोबरच सामूहिकरीत्या गरब्याचा उत्साह सळसळता असल्याचे पहावयास मिळाले. तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले असून तरुणाईचा आनंद शिगेला पोहचला होता. पारंपरिक पोशाख परिधान करून महिला, तरुण-तरुणींकडून जल्लोषपूर्ण वातावरणात ठिकठिकाणी दांडिया व गरब्याचा आनंद लुटला गेला. गरबा, दांडियाचा आनंद घेण्यासाठी गर्दी लोटली होती. त्यामुळे गरब्याचा सामूहिक खेळ चांगलाच रंगात आल्याचे दिसून आले. प्रसिद्ध गाण्यांच्या तालावर रंगलेला दांडिया पाहण्यास गर्दी झाली होती. पारंपरिक व रंगीबेरंगी वेशभूषेत दांडिया सुरू असताना आकर्षक विद्युत रोषणाई व पारंपरिक गीतांच्या तालावर तरुणी, महिला सामील झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!