सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

मराठा आरक्षणाची ठिणगी आता ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत; मेडशिंगी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीतील  उमेदवारांनी आपआपले उमेदवारी अर्ज घेतले मागे

सांगोला(प्रतिनिधी):- मराठा आरक्षणाची ठिणगी आता ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत पडली असून सांगोला तालुक्यातील मेडशिंगी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीतील  सर्वच उमेदवारांनी आपआपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे पोटनिवडणुक रद्द होण्याच्या मार्गावर आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर करत जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणूक नाही असा निर्धार करत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सर्वच उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आपले उमेदवारी अर्ज परत घेतले. तर वाढेगाव ग्रामपंचायतीची 1 जागा तर ह.मंगेवाडी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीतील 1 जागा बिनविरोध झाली आहे.

सांगोला तालुक्यातील सावे, वाढेगाव, चिकमहुद, खवासपूर या 4 ग्रामपंचायतीसाठी निवडणुक प्रकिया सुरु असून बुधवार दि.25 रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी  तब्बल 138 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज परत घेतले तर सरपंच पदाचे 31 उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता सरपंच पदाच्या 4 जागेसाठी 11 जण तर  सदस्य पदाच्या 50 जागासाठी  113 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशिब आजमावित आहेत.चिणके येथील 1 जागेच्या पोटनिवडणुकीसाठी दुरंगी लढत होणार आहे.

सावे व वाढेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी दुरंगी लढत होणार आहे. तर चिकमहुद ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी तिरंगी लढत तर खवासपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी चौरंगी लढत होणार आहे.  सावे ग्रामपंचायतीच्या 11 जागेसाठी 23 उमेदवार,  वाढेगांव ग्रामपंचायतीच्या 13 सदस्यांच्या जागेसाठी 28 उमेदवार, चिकमहूद ग्रामपंचायतीच्या 15 जागेसाठी 36 उमेदवार तर खवासपूर ग्रामपंचायतीच्या 11 जागेसाठी 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी  तहसिल कार्यालयाबाहेर उमेदवार, कार्यकर्ते आणि समर्थकांनी एकच गर्दी केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!