मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी  सकल मराठा समाज सांगोला तालुका यांच्यावतीने  बेमुदत साखळी उपोषण व धरणे आंदोलन

सांगोला:- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी  सकल मराठा समाज सांगोला तालुका यांच्यावतीने  शुक्रवार दिनांक 26/10/2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये  बेमुदत साखळी उपोषण व धरने आंदोलन करण्यात येणार आहे.याबाबत सांगोला तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी व सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्याच्या आव्हानास प्रतिसाद देत सांगोला तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये  शुक्रवार दिनांक 27/10/2023 पासून बेमुदत साखळी उपोषण व धरने आंदोलन सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजे पर्यंत करणार आहोत.
त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीने मराठा समाजाच्या आरक्षणाची बाजू मांडणे व शासनाच्या निषेध करणे या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे.सकाळी दहा ते सायंकाळी सहा या कालावधीमध्ये सांगोला तालुका व सांगोला शहर सकल मराठा समाजाच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी समाज बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button