सांगोला येथे रविवारी शाश्वत डाळिंब मार्गदर्शनाचे आयोजन

सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला येथील मिरज रोडवरील सदानंद मल्टीपर्पज हॉल येथे रविवार दिनांक 29 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता डाळिंबरत्न डॉक्टर बाबासाहेब गोरे यांचे मोफत डाळिंब मार्गदर्शन आयोजित केले आहे.
सातत्याने हवामानात होणाऱ्या बदलामुळे डाळिंब टिकवणे आणि पिकवणे हे एक आव्हानात्मक काम बनले आहे. त्यातच डाळिंब पिकाला भेडसावणाऱ्या तेल्या, मर या प्रमुख समस्या आहेत.
नवीन यशस्वी लागवडीचे तंत्रज्ञान, तेल्या नियंत्रित करून आणि झाडाला कुपोषण मुक्त करून झाड सशक्त करण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन ,मर रोग व्यवस्थापन, इतर रोग व कीड व्यवस्थापन , मृगबहार रेस्ट व्यवस्थापन या विविध मुद्द्यावर डाळिंबरत्न बी. टी .गोरे सर मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमासाठी प्रणाम ॲग्रोटेक पुणे, विजय ऍग्रो संगमनेर, डिलाईट ऍग्रो, सायन केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड ,नाशिक, नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, राजे ऍग्रो इंडस्ट्रीज ,आटपाडी या कंपन्यांचे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन यशराज गांडूळ खत प्रकल्पाचे उद्योजक सुरेश पवार, विजय कृषी सेवा केंद्र चे विजय मरगळे, विजयसिंह वराडे, रामभाऊ यमगर, केजीएन डाळिंब फार्म नझरेचे अशपाक काझी सर यांनी केले आहे.