वाढदिवसातून सामाजिक कार्य करुन जपली सामाजिक बांधिलकी; अमरदादा लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त अल्पोपहार व फळांचे वाटप

सांगोला(प्रतिनिधी):- सामाजिक उपक्रम राबवून अमर लोखंडे यांचा वाढदिवस उत्साही वातावरणात रविवार दि.21 जुलै रोजी साजरा करण्यात आला.श्री.अमर दादा लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रम, ग्रामीण रुग्णालय सांगोला, मूकबधिर शाळा सांगोला येथे अल्पोपहाराचे व फळे वाटप करण्यात आले.
समाजामध्ये राहून समाजासाठी काही करण्याची इच्छा असेल तर आपण आपला वाढदिवस समाजासाठी करू शकतो वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक विशेष दिवस असतो प्रत्येक जण आपापल्या परीने वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न करतो असाच एक वाढदिवस काल अमरदादा लोखंडे यांच्या मित्रपरिवाराने साजरा केला. अमरदादा लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिातोश्री वृद्धाश्रम, ग्रामीण रुग्णालय सांगोला, मूकबधिर शाळा सांगोला येथे अल्पोपहाराचे व फळे वाटप करुन साजरा केला.
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा केला. त्याबद्दल अमरदादा लोखंडे मित्रपरिवाराच्या सर्व सदस्यांचे कौतुक होत आहे.यावेळी रविराज चौगुले, संतोष महीमकर, देवराज लोखंडे, प्रताप देशमुख, सागर लवटे, बिरा जांगळे, महेश गुळमिरे, राहुल पाटणे, अरूण ढोले, गुरूनाथ इंगोले, सचिन आगरकर, दत्ता वाघमारे उपस्थित होते.